saleel kulkarni  sakal
Premier

Marathi Singer New Business: लोकप्रिय गायकाची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा व्यवसाय, पुण्यातील या भागात आहे हॉटेल

Saleel Kulkarni Started New Venture In Pune: लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी पुण्यात नवीन हॉटेल सुरू केलं आहे.

Payal Naik

गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकार व्यवसाय क्षेत्राकडे वळताना दिसले. अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. कुणी नवीन हॉटेल सुरू केलं तर कुणी साड्यांचा ब्रँड सुरू केला. कुणी दागिन्यांचा ब्रँड सुरू केला तर कुणी फार्महाउस सुरू केलं. आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे. लोकप्रिय मराठमोळे गायक सलील कुलकर्णी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सलील यांनी पुण्यात नुकतंच त्यांच्या नव्या हॉटेलचं उदघाटन केलं आहे. त्यांच्या आईच्या हस्ते त्यांनी या हॉटेलचं उदघाटन केलं आहे.

सलील कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी आता आपल्या आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केली आहे. त्यांनी पुण्यात सिंहगड रोड खाऊगल्ली येथे नवीन हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलचं नाव बँगलोर कँटीन आहे. त्यांनी ३० जून रोजी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, 'वर्ल्ड कप जिंकलोय… सगळे खुशीत आहेत. तुम्हा सगळ्यांना दोन चांगल्या बातम्या सांगायला याहुन उत्तम मूड आणि नेमका दिवस असुच शकत नाही. एक नवीन स्पेशल व्हेंचर आणि नवीन चित्रपट.'

saleel kulkarni hotel

उया व्हिडिओमध्ये ते म्हणतात, ' पुण्यातील बँगलोर कँटीन या हॉटेलची चव त्यांना विशेष आवडली होती. त्याठिकाणचा डोसा आणि कॉफी पिऊन त्यांना असे वाटलेले की यामध्ये आपलाही सहभाग हवा. म्हणून ते आता 'बँगलोर कँटीन' या व्हेंचरशी जोडले गेले आहेत. त्यांनी या हॉटेलची नवीन शाखा सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये सुरू केली आहे. . या उद्घाटनावेळचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, 'लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटीनचं उद्घाटन केलं.' आता चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT