Prajakta Mali  Esakal
Premier

Prajakta Mali : "त्यांचा फोन टाळायची माझी हिंमत नाही"; वडिलांसाठी प्राजक्ताची खास पोस्ट

Actress Prajakta Mali's special post for her father : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलीये. या बरोबर तिने शेअर केलेला वडिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prajakta Mali's Post : संपूर्ण महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल भरभरून बोलणारी आणि कायमच सगळ्यांचं कौतुक करणारी म्हणून प्राजक्ता माळी प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकतंच तिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

प्राजक्ताची पोस्ट

प्राजक्ताने सोशल मीडियावर फादर्स डे निमित्त वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली. ती म्हणाली," माझे वडील गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला खूप आजारी होते. ते चालूही शकत नव्हते आणि तरीही ते जोरजोरात 'में हूँ डॉन' गात होते.

मला या जगातील खूप गोड आणि निरागस वडील मिळाले आहेत. मी जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ मुंबईत राहत आहे आणि ते तरीही मला दिवसातून दोनदा फोन करतात आणि हा फोन मी न उचलुनयाची मी हिंमत करू शकत नाही. ते इतकंच विचारतात,"जेवलीस का?"

मी किती भाग्यवान आहे ! त्यांच्यासारखीच ज्यांचे वडील कायम त्यांच्या सोबत असतात आपल्याला मार्गदर्शन करायला, प्रेम करायला आणि सुरक्षित वाटण्यासाठी.

आपले पालक आपल्यासाठी देवदूत असतात आणि त्यांना आपल्यासाठी देवानेच पाठवलेलं असतं. "

सोबत तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताचे वडील जोरजोरात गाणं म्हणताना दिसत आहेत आणि तिचा पूर्ण परिवार त्यावर डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडीओ व्हायरल

प्राजक्ताच्या संपूर्ण फॅमिलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात तिचं एकत्र कुटूंब असून तिचा संपूर्ण परिवार कायम एकत्र मिळून धमाल करताना दिसतो. तिच्या वडिलांचा हा जोश आणि आजारपणात आनंदी राहायची त्यांची वृत्ती सगळ्यांना खूप आवडली.

वडिलांचं आजारपण

गेल्या वर्षी प्राजक्ताचे वडील खूप आजारी होते. तिने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबत तिच्या भावना शेअर केल्या होत्या. सगळ्या शूटिंगच्या गडबडीतही प्राजक्ताने आणि तिच्या आईने तिच्या वडिलांची काळजी घेतली. प्राजक्ताचे वडील पोलीस दारात कार्यरत होते आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT