sushila sujeet  esakal
Premier

Sushila- Sujeet: कोण सुशीला अन् कोण सुजीत? ‘सुशीला- सुजीत' चित्रपटाच्या दमदार मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Prasad Oak Swapnil Joshi New Movie Sushila Sujeet Poster: लोकप्रिय मराठी अभिनेते प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आता लवकरच एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेता प्रसाद ओक हे दोघेही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. नुकत्याच त्या दोघांनी एकमेकांना त्यांच्या चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि हे दोघे एकत्र यावेत अशा प्रतिक्रिया देखील मराठी चित्रपट रसिकांमध्ये उमटल्या. त्यानंतर काही तासांतच हे दोघे एकत्र येत असल्याची बातमी येवून धडकली आहे. प्रसाद आणि स्वप्नील हे आगामी ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातून एकत्र येत आहेत.

प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून स्वप्नील जोशीचं कौतुक केलं होतं. ‘नवरा माझा नवसाचा २’ नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाने ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. त्यामुळे प्रसादने स्वप्नीलचं कौतुक केलं आणि पाठोपाठ स्वप्नीलने देखील प्रसादला त्याच्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर २’साठी खास शुभेच्छा दिल्या होत्या. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र आहेत. आता हे मित्र मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'सुशीला- सुजीत' या चित्रपटात ते एकत्र दिसणार आहेत. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्स यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर असून हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानलं जातंय . स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, संजय मेमाणे यांच्यासह मंजिरी ओक आणि निलेश राठी यांची सुद्धा ही एकत्रित निर्मिती आहे. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. “या चित्रपटाचे नाव जरी ‘सुशीला-सुजीत’ असले तरी हे नाव ऐकण्या किंवा वाचण्यापेक्षा बघण्यात खूप गंमत आहे. त्याचे विज्युअल गमतीशीर आहेत. ती काय गंमत आहे ते तुम्हाला त्याचे पोस्टर बघून कळते,' असं स्वप्नील म्हणाला आहे.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका करणारा स्वप्नील आज आघाडीचे कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांने या आधीही काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत.

प्रसाद ओक याने अनेक नाटके, चित्रपट आणि जवळपास मलिकांमध्ये कामे केली आहेत. रमा माधव, बाळकडू, चिरंजीव, फर्झंद, क्षण, ती रात्र, एक डाव धोबीपछाड, हिरकणी, धर्मवीर यांसारखे चित्रपट, पिंपळपान, आभाळमाया, हम तो तेरे आशिक है, क्राईम पॅट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव या चार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, बेचकी, रणांगण, आलटून पालटून यांसारखी नाटके केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT