Murlidhar Mohol and pravin tarde SAKAL
Premier

Murlidhar Mohol: "मुळशीची शान, पुण्याचा अभिमान..."; मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

Pravin Tarde: मुरलीधर मोहोळ हे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर अभिनेते प्रवीण तरडे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Pravin Tarde: नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींसोबतच इतर काही मत्र्यांनी देखील शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता मुरलीधर मोहोळ हे मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर अभिनेते प्रवीण तरडे (pravin tarde) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांची पोस्ट

प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "मित्रा, आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही .. कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास.. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्या सारखं वापरतात पण तू ते ताट भरून घेतलंस, पोटभरून रिचवलंस.. कदाचित म्हणुनच कोरोनाच्या महामारीत तू पुण्याला वाचवलंस."

"तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली.. तुला लाखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली.. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली. पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतय ही तर फक्तं सुरवात आहे अजुनही परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम या दैवी संदेशा पासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू.पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो,तुझं खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.", असंही प्रवीण यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI : भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी तगडा ऑलराऊंडर दिसणार किंवा...

Latest Marathi News Live Update : अरुणावतीचा कालव्याला भगदाड, शेतकऱ्यांचे नुकसान

Pune Book Festival : 'शांतता... पुणेकर वाचत आहेत'; 5 लाखांहून अधिक पुणेकर एकाच वेळी वाचून घडवणार वाचनाचा विश्वविक्रम

Leopard Attack : पारनेर तालुक्यातील धक्कादायक घटना ! 'बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू'; अंत्यसंस्कारास नकार, पती-पत्नी शेतात गेले अन्..

Shahid Kapoor: ‘वडिलांचं नाव कधीच वापरलं नाही’; शाहिद कपूरच्या स्पष्ट कबुलीनं घराणेशाहीवरील चर्चा पुन्हा पेटली

SCROLL FOR NEXT