Premachi Goshta esakal
Premier

Premachi Goshta: कार्तिकचा खरा चेहरा मुक्तांसमोर होणार उघड, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षकांना धक्का

Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्स मुळे कायमच चर्चेत असते आणि आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

priyanka kulkarni

Premachi Goshta: स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta). तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan), राज हंचनाळे (Raj Hanchanale) आणि अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने पहिल्यापासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मुक्ता, सई आणि सागर यांच्या नात्याची गोष्ट असलेली ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्स मुळे कायमच चर्चेत असते आणि आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

15 एप्रिल 2024 ला या मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. कार्तिकचा खरा चेहरा मुक्तांसमोर आता उघड होणार आहे. मुक्ता घरी एकटी असताना कार्तिक तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तर राज तेव्हाच घरी पोहोचतो आणि त्याला समोरचं दृश्य पाहून धक्का बसतो.

पहा प्रोमो:

कार्तिकचं खरं रूप सागरसमोर येणार का? सागर मुक्ताला कार्तिकपासून वाचवू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. कार्तिक हा सागरच्या बहिणीचा नवरा असून या आधीही त्याने मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचं मालिकेच्या मागील काही भागांमध्ये दाखवण्यात आलंय त्यातच इंद्राला मुक्ताचं बाहेर अफेअर सुरु असल्याचा संशय आहे. त्यामुळे ती मुक्तावर नजर ठेवून आहे. त्यामुळे मुक्ता तिचा खरेपणा सिद्ध करू शकेल का? कोमलला कार्तिकचं खरं रूप समजेल का? याची उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागेल.

सध्या मालिकेत सईला सागर आणि मुक्तापासून लांब करण्यासाठी सावनी सर्व प्रकारचे प्रयत्न करताना दिसतेय. सावनीला तिच्या प्लॅनमध्ये यश मिळणार का? हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

UP Investment: UP ला मिळाला मानाचा “एग्जेम्प्लर अवॉर्ड”! ऑगस्टमध्ये सिंगापूर-जपान वारी; पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन

Hypnotism in Kolhapur : आधी संमोहित केलं, मग तब्बल 30 तोळे दागिने घेऊन पसार झाले; कोल्हापुरात बंगाली कारागिरासोबत धक्कादायक प्रकार, नेमकं घडलं काय?

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

SCROLL FOR NEXT