Nick Jonas esakal
Premier

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Nick Jonas: नुकताच निकनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून निकनं चाहत्यांना सांगितलं की, त्याला influenza-A चा संसर्ग झाला आहे.

priyanka kulkarni

Nick Jonas: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा (priyanka chopra) पती आणि गायक निक जोनास (Nick Jonas) सध्या चर्चेत आहे.निकची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे निकला त्याचं कॉन्सर्ट पुढे ढकलावं लागलं. नुकताच निकनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून निकनं चाहत्यांना सांगितलं की, त्याला influenza-A चा संसर्ग झाला आहे.

निकनं शेअर केला व्हिडीओ

निक जोनासने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निक हा कॉन्सर्ट पुढे ढकलल्याबद्दल चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. जोनास ब्रदर्सचे कॉन्सर्ट टूर पुढे ढकलण्याामागचे कारण निकनं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. निकनं सांगितलं की, त्याला इन्फ्लूएंझा ए व्हायरसची लागण झाली आहे.

निक जोनासने व्हिडिओमध्ये सांगितलं, "मी निक आहे, मी एक बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी मजेदार नाही पण सांगणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी मला खूप अस्वस्थ वाटू लागले होते. मला बोलता येत नव्हते. गेल्या दोन-अडीच दिवसांत माझी प्रकृती खराब झाली आहे. मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवत आहे, तसेच खूप खोकला येत आहे."

निकनं व्हिडीओला कॅप्शन दिलं, "नमस्कार मित्रांनो. मला इन्फ्लूएन्झा-एचा स्ट्रेन झाला आहे, जो सर्वत्र पसरत आहे. मी सध्या कोणत्याही कॉन्सर्टमध्ये गाऊ शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा शो ऑगस्टमध्ये होणार आहे. हा शो आता ऑगस्टमध्ये रि-शेड्युल करण्यात आला आहे."

पाहा व्हिडीओ:

निकनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. निक जोनासच्या कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 21 आणि 22 ऑगस्टला त्याचे कॉन्सर्ट होणार आहे.जोनास ब्रदर्सचे कॉन्सर्ट्स आयर्लंडमध्ये आयोजित केला जाईल, त्यानंतर निक सप्टेंबरमध्ये यूके, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्पेन, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये निक आणि त्याचे भाऊ परफॉर्म करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT