priyanka chopra  esakal
Premier

Priyanka Chopra: दमले गं बाई! प्रियांका चोप्राच्या चिमुकल्या लेकीची किचनमध्ये लुडबुड, आजीला चपाती बनवायला करतेय मदत

Priyanka Chopra Daughter Malti Merie : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या भारतातील घराचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिची लेकही दिसते आहे.

Payal Naik

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. प्रियांकाने परदेशी गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. चाहते नेमीचं तिच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असता. अभिनेत्रीही आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसते. आताही तिने स्वतःचे आणि मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात तिची चिमुकली लेक चक्क चपाती बनवताना दिसतेय.

प्रियांका सध्या तिच्या 'द ब्लफ' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र सध्या तिची आई मधू चोप्रा तिच्या घरी गेली आहे. त्यामुळे तिला माहेरी असल्यासारखं वाटतंय. त्यात आई तिला घरातलं जेवण बनवून खाऊ घालतेय त्यामुळे ती खूप आनंदी आहे. अशात तिने तिचे आणि कुटुंबियांचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात सुरुवातीला स्टंट्स करण्यापूर्वी ती पॅडिंग कशी घालते हे दाखवताना तिने एक सेल्फी शेअर केला आहे. आणि दुसराच फोटो तिच्या लेकीचा आहे जी किचनच्या खुर्चीवर बसून टेबलवर चपाती लाटताना दिसतेय. तिच्या हातात लाटणंदेखील आहे. त्यानंतर आई तिला कोणती भाजी खायला घालतेय हेदेखील सांगितलं आहे,.

त्यानंतर प्रियांका मालतीसोबत 'मोआना' या लहान मुलांच्या चित्रपटातील गाणं गाताना दिसतेय. तिच्या कुशीत मालती देखील आहे. त्या दोघींच्याही हातात माइक आहेत. तिने तिच्या परदेशातील घरातील किचनचा फोटोही दाखवला आहे. जिथे मालतीची काही खेळणीदेखील दिसत आहेत. त्यानंतर ती ऑलिम्पिक पाहत असल्याचं दिसतंय. ती टीम इंडियाचं कौतुक करताना दिसतेय. तिचे हे फोटो पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT