Ketaki Chitale sakal
Premier

Pune Porsche Accident : "पोलीस महानालायक असतात..."; पुण्यातील पोर्शे गाडी अपघाताबाबत केतकीनं शेअर केला व्हिडीओ

Ketaki Chitale On Porsche Accident : अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) पुण्यातील अपघाताबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Ketaki Chitale: काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) एका पोर्शे गाडीनं दोघांना चिरडले. ती पोर्शे गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही घटना कल्याणीनगर (Kalyani Nagar) येथे रविवारी (ता. १९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आयटी अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे देशभरात खळबळ उडाली. अनेक जण या अपघाताबाबत भाष्य करत आहेत. अशातच आता अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) या घटनेबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. केतकी चितळेनं या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाली केतकी?

केतकीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की केतकी म्हणते, "ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काही चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा हा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहित आहे."

केतकीनं तिच्या लेट्स टॉक या युट्यूब चॅनलवर देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केतकीनं पुण्यातील अपघाताबाबत तिचं मत व्यक्त केलं. यामध्ये ती म्हणाली, "जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते, त्यांनाच पोलिसांनी अरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं, ही गोष्ट नवीन नाहीये. माझ्यावर तर डायरेक्ट डेथ थ्रेट देण्यात येत होते. तेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये मी गेले होते, ही केतकी तुच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी तेव्हा विचारले होते."

व्हिडीओमध्ये केतकीनं पोलिसांवर टीका केली आहे. केतकीच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT