radhika merchant with father  
Premier

Anant Radhika Wedding: लेक निघाली सासरला! अनंतला हार घालताच भरून आले राधिकाच्या वडिलांचे डोळे; मुलीवरची माया रडूही देईना

Radhika Merchant Father Emotional Video: अनंत अंबानी आणि राधिका १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा गृह शांती पूजेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Payal Naik

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी काही तास उरले आहेत. ते दोघे आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हळद, मेहंदी, शिवशक्ती पूजा आणि आता त्यांच्या गृह शांती पूजेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंबानी आणि मर्चंट कुटुंब पूजा करताना दिसत आहे. सोबतच राधिका आणि अनंत एकमेकांकडे पाहत खूप छान हावभाव करताना दिसत आहेत. त्यात नवी नवरी जेव्हा अनंतच्या गळ्यात हार घालते तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात येणारं पाणीही स्पष्ट दिसतंय.

राधिकाने गृहशांती पूजेसाठी क्रीम आणि गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे. तर लाल आणि सोनेरी रंगात अनंतही खूप छान दिसत आहि. हातात पूजेची थाळी पकडून राधिकाची आई शैला मर्चंट होणाऱ्या जावयाचं स्वागत करते. व्हिडिओमध्ये राधिका अनंतच्या गळ्यात फुलांची माळ टाकताना दिसते आहेत. हे पाहून स्वतः मुकेश अंबानी भावुक होताना दिसतात. त्यानंतर कॅमेरा राधिकाच्या वडिलांच्या वळतो. या व्हिडिओमध्ये वीरेन मर्चंट आपल्या लेकीसाठी खूप आनंदी असलेले पाहायला मिळतायत. सोबतच मुलीला हार घालताना पाहून तेदेखील भावुक होतात आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. भावनेच्या भरात ते आपल्या मुलीला मिठी मारताना दिसतात.

त्या दोघांचे खास क्षण पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं आहे नेटकरीही भावुक झाले आहेत. आपण जणू तिथेच उभे आहोत आणि या बाप लेकीचं सुंदर नातं पाहत आहोत असं नेटकरी म्हणत आहेत. आज हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. चाहते आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT