Rakhi Sawant Health Update SAKAL
Premier

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालंय? पूर्वाश्रमीच्या पतीनं दिली हेल्थ अपडेट

Rakhi Sawant Ex husband: राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशनं तिच्या हेल्थबाबत सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Rakhi Sawant Health: राखी सावंत (Rakhi Sawant) हिचे रुग्णालयातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. या फोटोमध्ये राखी ही रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसत आहे. राखीला नेमकं काय झालं आहे? असा प्रश्न तिचे व्हायरल झालेले फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला. अशातच आता राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेशनं तिच्या हेल्थबाबत सांगितलं आहे.

राखीच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं दिली हेल्थ अपडेट

न्यूज 18 ला रितेशनं राखीची हेल्थ अपडेट दिली आहे. त्यानं सांगितलं की, राखी सावंतच्या गर्भाशयात ट्यूमर आढळून आला आहे. तो म्हणाला, “छातीत दुखत असल्यामुळे राखीला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. त्यांना तिच्या गर्भाशयात ट्यूमर आढळून आला आहे. तिच्या पोटातही दुखत होते. हा कर्करोग असावा, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला . सध्या तिच्या चाचण्या केल्या जात आहेत.”

नुकताच रितेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, "राखीने स्वतःची एक अशी इमेज तयार केली आहे जिथे लोकांना वाटते की, तू हे सर्व नाटक करत आहे. लांडगा आला रे आला कथेप्रमाणे तिचं नेहमी होत असतं. जेव्हा तिच्यासोबत खरोखर गोष्टी घडतात तेव्हा लोकांना वाटतं की ती नाटक करत आहे, कृपया तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा"

ऑक्टोबर 2021 मध्ये राखीने बिग बॉस 15 मध्ये रितेश आणि तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण फेब्रुवारी 2022 मध्ये राखी आणि रितेश वेगळे झाले. त्यानंतर राखीने आदिल खान दुर्राणीशी लग्न केले, परंतु त्यांचाही संसार फार काळ टिकला नाही. राखी आणि आदिल देखील विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

farmer Son Success Story: पळशीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी अधिकारी; इच्छापूर्तीसाठी चिकाटीने केला अभ्यास, आई-वडिलांचे स्वप्न झालं पूर्ण!

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

SCROLL FOR NEXT