Deepika Padukone: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. दीपिकानं नुकतीच नाग अश्विनच्या 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या इव्हेंटमध्ये 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटामधील कलाकारांसोबतच अभिनेता राणा दग्गुबतीनं (Rana Daggubati) देखील हजेरी लावली होती. राणानं या इव्हेंटमध्ये दीपिकाच्या प्रेग्नन्सीवर मिश्किल टिप्पणी केली. या टिप्पणीवर दीपिकानं खास रिप्लाय दिला.
'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दीपिका पदुकोणनं प्रेग्नंट महिलेची भूमिका साकारली आहे. आता या इव्हेंटमध्ये दीपिकाने चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली.मुंबईतील कल्कि 2898 एडी या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमादरम्यान, अभिनेता राणा दग्गुबतीनं दीपिकाच्या बेबी बंपकडे बघून तिच्या प्रेग्नन्सीवर मिश्किल टिप्पणी केली. तो म्हणाला, "चित्रपटानंतरही तू तुझ्या चित्रपटातील भूमिकेत राहायचं ठरवलं होतंस का?"
राणाच्या मिश्किल टिप्पणीवर दीपिकानं हसून रिप्लाय दिला, "होय, हा चित्रपट बनायला तीन वर्षे लागली, त्यामुळे आणखी काही महिने बेबी बंप ठेवावं, असा विचार माझ्या मनात आला."
कल्कि 2898 एडी हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तसेच दीपिका, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.