Raveena Tandon SAKAL
Premier

Raveena Tandon: "डॅशकॅम आणि सीसीटीव्ही..."; व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अखेर रवीनानं सोडलं मौन

Social Media Viral News: 1 जूनच्या रात्री रवीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

priyanka kulkarni

Raveena Tandon: गेल्या काही दिवसांपासून रवीना टंडन (Raveena Tandon) ही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रवीनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये काही लोक रवीनाला ओरडताना दिसले. या व्हिडीओमधून एका व्यक्तीनं रवीनावर गंभीर आरोप केले. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती म्हणाला की, "रवीनाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. त्या गाडीनं माझ्या आईला टक्कर दिली. त्या ड्रायव्हरनं माझ्या भाचीला मारलं, आईला मारलं. त्यानंतर रवीना टंडन ही दारुच्या नशेत आली. तिनं देखील माझ्या आईला मारलं." या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर झाली, अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर रवीनानं भाष्य केलं आहे.

रवीनानं शेअर केली पोस्ट

1 जूनच्या रात्री रवीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रवीनाला रस्त्यावर काही लोकांनी घेरलेलं दिसलं. काही लोकांनी रवीनावर मारहाण केल्याचा आरोप केला. अशातच आता रवीनानं या प्रकरणावर मौन सोडलं आहे. रवीनानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "या भावनिक प्रेमासाठी, विश्वासासाठी धन्यवाद! या कथेचा सारांश काय? आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही बाहेर ठेवा!"

Raveena Tandon

एका कुटुंबानं रवीनावर मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यामध्ये दिसले की, रवीनाचा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेऊन सोसायटीमध्ये घेऊन जात होता तर संबंधित कुटुंब रस्त्याने चालत होतं. त्यानंतर या कुटुंबाने गाडी थांबवली आणि ड्रायव्हरला गाडी रिव्हर्स घेताना मागे बघत जाण्यावरून ओरडू लागले. त्यामध्ये त्यांच्यात वाद झाला असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

SCROLL FOR NEXT