rinku rajguru father  sakal
Premier

Rinku Rajguru: तुम्हाला लेकीसाठी कसा मुलगा हवा? रिंकू राजगुरूचे वडील म्हणतात- माझी मुलगी जिथे काम करते...

Rinku Rajguru Father On Her Marriage: लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने फादर्स डे निमित्त दिलेली एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

सकाळ डिजिटल टीम

Rinku Rajguru: 'सैराट' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सैराटच्या यशानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. तिने 'झिम्मा २' मधूनही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. रिंकू चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सक्रीय असते. ती कायमच चाहत्यांसोबत जोडलेली राहते. रिंकूने नुकत्याच झालेल्या फादर्स डे निमित्त दिलेली मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत तिच्या वडिलांनी आपल्याला कसा जावई हवाय याबद्दल सांगितलं आहे.

रिंकूने नुकतीच तिच्या वडिलांसोबत राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रिंकूच्या वडिलांना तुम्हाला कसा जावई हवा याबद्दल विचारणा करण्यात आली. याबद्दल बोलताना रिंकूचे वडील म्हाणाले, 'ती ठरवेल तोच पण तिने सांगितल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार.' यावर रिंकू वडिलांना विचारते, 'म्हणजे मी म्हणाले पप्पा, हा मुलगा तर तुम्ही हो म्हणणार लगेच?' त्यावर रिंकूचे वडील म्हणतात, 'नाही, आम्ही चेक करणार. जसं आम्ही तिला फ्रिडम दिलं, तसं त्यानेही दिलं पाहिजे. नाहीतर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हे क्षेत्रच असं आहे की प्रत्येक ठिकाणी जावं लागणार.'

पुढे रिंकूचे बाबा म्हणाले, 'तिचं कामच असं आहे. ह्या गोष्टी ज्याला कळतात, जो तिला समजून घेऊ शकेल, तसा मुलगा असेल तर आमची अडचणच नाही.' यावर रिंकू म्हणते, बघ किती साधे आहेत आमचं घरचे.' रिंकूचे बाबा शिक्षक आहेत. ते कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीसाठी तिला समजून घेणारा आणि तिच्या क्षेत्राला समजून घेणारा मुलगा हवा असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT