Premier

Rishi Kapoor : स्वतःच्याच लग्नात ऋषी कपूर पडले बेशुद्ध, काय घडलं नेमकं घ्या जाणून

Rishi Kapoor get faint in his own wedding : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर त्यांच्याच लग्नात बेशुद्ध पडले होते. काय होता हा किस्सा जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील दमदार, हँडसम अभिनेते म्हणजे ऋषी कपूर. काही वर्षांपूर्वी ऋषी यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. पण अजूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान टिकून आहे. ऋषी यांचा आज 4 सप्टेंबरला वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या काही खास आठवणी.

ऋषी कपूर कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचं सडेतोड बोलणं कायमच काही ना काही वाद सुरु करायचं. पण तुम्हाला माहितीये का ? ऋषी स्वतःचंच लग्नात बेशुद्ध पडले होते. काय आहे ही आठवण ? जाणून घेऊया.

नीतू आणि ऋषी यांनी 22 जानेवारी 1980 रोजी कपूर कुटुंबाच्या चेंबूर येथील प्रसिद्ध घरी- आरके हाऊसमध्ये थाटात लग्न केलं. त्यांच्या या आलिशान लग्नसोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. फक्त चित्रपटसृष्टीतीलच नाही तर विविध क्षेत्रातील लोकांनीही हजेरी लावली होती.

नीतू कपूर यांनी त्यांच्या लग्नाची आठवण एका मुलाखतीत सांगितली. त्यांनी सांगितलं कि त्यांच्या लग्नात एवढी लोकं हजर होती कि ती गर्दी बघून ते दोघंही भर लग्नात बेशुद्ध झाले होते. शेवटी त्यांना एका खोलीत नेऊन शांत करण्यात आलं. स्वतःला शांत ठेवण्यासाठी ते दोघंही ब्रँडी पीत होते. त्यामुळे फेरे घेताना नीतू नशेत होत्या अशी आठवण त्यांनी सांगितली.

ऋषी कपूर यांना उत्तम इंग्रजी यायचं. याबद्दल नीतू यांनी सांगितलं कि, जेव्हा कधी आमच्यात भांडण व्हायचं तेव्हा ऋषी एखादा कठीण शब्द बोलायचे आणि त्यामुळे मला कळायचं नाही पुढे काय बोलावं आणि मी गप्प बसायचे आणि नंतर डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधायचे. त्यामुळे त्यांच्यातील बरीच भांडण टळायची.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर खेल खेल में, अमर अकबर अँथनी, कभी कभी, झूठा कहीं का आणि धन दौलत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्या दोघांना रिधिमा आणि रणबीर ही दोन मुलं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT