riteish Deshmukh, Vilasrao Deshmukh  sakal
Premier

VIDEO: "ते संपले पण काँग्रेस संपली नाही..."; रितेशनं शेअर केला विलासराव देशमुख यांच्या भाषणाचा व्हिडीओ

Vilasrao Deshmukh: रितेशनं विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझे वडील विलासराव देशमुख यांची आठवण"

priyanka kulkarni

Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा अनेक वेळा सोशल मीडियावर त्याच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. नुकताच रितेशनं विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर विलासराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे कौतुक करताना दिसत आहे.

रितेशनं शेअर केला व्हिडीओ

रितेशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख हे भाषण करताना दिसत आहेत. भाषणात विलासराव देशमुख म्हणतात, "लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालंय.अनेकांनी काँग्रेसला संपवायचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ते संपले पण काँग्रेस संपली नाही. काँग्रेसला मोठा इतिहास आहे. त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या काँग्रेस पक्षाला आहे. काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही. काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ, ही काँग्रेसची भूमिका आहे. आम आदमी म्हणजेच सामान्य माणूस."

पाहा व्हिडीओ:

"काँग्रेसचा हात हा फक्त श्रीमंतांबरोबर आहे, असं कधी काँग्रेसने म्हटलं नाही. आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस, ही भूमिका काँग्रेसने स्विकारली. महिलांना कालपर्यंत 33% आरक्षण होतं आता 50% झालं. आमच्या भगिनींना आता जिल्हापरिषद, नगरपरिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येच्या 50% मानाचं स्थान काँग्रेसने प्राप्त करून दिलं. काँग्रेस कामाच्या बळावर मत मागतेय, आश्वासनांच्या बळावर नाही. बाकीचे लोक आश्वासनांवर मत मागतायत. आम्ही विचारांवर आणि केलेल्या कामांवर मत मागतोय. उजळ माथ्याने तुमच्यासमोर येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे आहे म्हणजेच काँग्रेसकडे आहे.", असंही विलासराव देशमुख भाषणात म्हणतात.

रितेशनं विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझे वडील विलासराव देशमुख यांची आठवण"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT