Rupali Dance on Angaro Esakal
Premier

Viral Video : 'अंगारो' मॅशअपवर थिरकल्या अनुपमा आणि संजना ; अनिरुद्धची इथेही लुडबूड, व्हिडीओ झाला व्हायरल !

Rupali Ganguly And Rupali Bhosale Viral Dance Video : अभिनेत्री रुपाली भोसले आणि अभिनेत्री रुपाली गांगुलीने सोशल मीडियावर एक भन्नाट डान्स रील शेअर केलं.

सकाळ डिजिटल टीम

Rupali & Rupali : अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा २' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. 'पुष्पा २' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे आणि सध्या या सिनेमातील 'अंगारो' हे गाणं खूप गाजतंय. तर आता अंगारो गाण्याचं रिमिक्स व्हर्जनही सोशल मीडियावर चर्चेत आहे. लाजरान साजरा मुखडा या गाण्याबरोबर 'अंगारो' गाणं रिमिक्स करण्यात आलं असून यावरचे डान्स रील्स सोशल मीडियावर गाजत आहेत.

या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रिमिक्स व्हर्जनवर अनुपमा मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली आणि आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसले या एकमेकींच्या उत्तम मैत्रिणी आहेत आणि यांनी नुकतंच या रिमिक्स व्हर्जनवर डान्स रील शेअर केलं.

दोन्ही रुपाली एकमेकांना अनेकदा सेटवर भेटतात. त्यांची मैत्री सगळ्यांनाच खूप आवडते. सोशल मीडियावर त्यांचे सेटवर एकत्र गप्पा मारतानाचे फोटोजही व्हायरल झाले आहेत.

रुपाली आणि रुपालीचं डान्स रील

या दोन्ही रुपालींनी शेअर केलेलं हे डान्स रील सोशल मीडियावर शेअर केलं. त्या दोघींचं हे रील चांगलंच चर्चेत आहे. तर या रीलमध्ये अनिरुद्धच्या सरप्राईज एन्ट्रीने सगळेचजण चकित झाले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत त्या दोघींच्याही डान्स स्किलचं कौतुक केलं आहे. "जेव्हा रुपाली रुपालीला भेटते तेव्हा हे होतं. अशाच अजून रील्स करू. " असं कॅप्शन रुपालीने या व्हिडिओला दिलं आहे.

या दोघींच्या डान्सवर एका युजरने कमेंट करत म्हंटलं कि,"वा अनुपमा.. माझी फेव्हरेट आणि रूपाली सुध्दा फेव्हरेट" असं म्हंटल तर एकाने "तुम्ही दोघांनी एकत्र एक छान सिरीयलमध्ये काम करा." अशी कमेंट केली आहे.

अनुपमा या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनुपमा आता एका वृद्धाश्रमात नोकरी करणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे तर अनुज एकटा पडल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती संजना आणि अनिरुद्ध कडून घर मिळवण्यासाठी एका कुकिंग स्पर्धेत भाग घेणार असल्याचं दाखवलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT