sakal premier awards 2024 baipan bhari deva baaplyok subhedar movie Jury Special Award Sakal
Premier

Sakal Premier Awards 2024 : ‘बाईपण भारी देवा’, ‘बापल्योक’, ‘सुभेदार’ला ज्युरी स्पेशल पुरस्कार

ठाणे येथे ‘सकाळ प्रीमियर सोहळ्या’त होणार विशेष गौरव; मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होत असते. दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ आणि दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हे दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे होते. चाकोरीबाहेरच्या कलाकृती म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.

आता त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. ‘सकाळ प्रीमियर सोहळ्या’त दोन्ही चित्रपटांचा ज्युरी स्पेशल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’लाही परीक्षक पसंतीचा चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.

ज्युरी स्पेशल पुरस्कार मिळवलेल्या तिन्ही चित्रपटांना १२ जूनला ठाणे येथे होणाऱ्या ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’त गौरवण्यात येणार आहे. पी. एन. जी. ज्वेलर्स लि. या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रमही यानिमित्त रसिकांना अनुभवता येणार असून तो सर्वांसाठी खुला आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. जया (रोहिणी हट्टंगडी), शशी (वंदना गुप्ते), केतकी (शिल्पा नवलकर), साधना (सुकन्या कुलकर्णी-मोने), पल्लवी (सुचित्रा बांदेकर) आणि चारू (दीपा परब-चौधरी) या सहा बहिणींचा स्वतःचा असा विविधरंगी जीवनप्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

त्याला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली. ‘सैराट’नंतर मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम यश मिळविणारा चित्रपट म्हणून त्याची इतिहासामध्ये नोंद झाली. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि माधुरी भोसले यांनी केली आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांचा वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘बापल्योक’ चित्रपटही सगळ्यांच्या पसंतीस उतरला.

नाईंटीनाईन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली विजय शिंदे यांनी आणि बहुरूपी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली शशांक शेंडे व मकरंद माने यांनी त्याची निर्मिती केली आहे. अभिनेता शशांक शेंडे यांनी वडिलांची, तर विठ्ठल काळे यांनी त्यांच्या मुलाची भूमिका त्यात साकारली आहे. हे दोन्ही चित्रपट वेगळ्या जॉनरचे होते आणि म्हणूनच रसिकांनी त्यांना भरघोस प्रतिसाद दिला.

‘सुभेदार’चाही होणार गौरव

मराठी चित्रपटसृष्टीने ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा कायम राखली आहे. वर्षभरात दोन ते चार ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मागील वर्षी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्यातील साहसी दृश्‍ये, वेशभूषा-केशभूषा, अभिनय इत्यादी सर्वच बाबींनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा त्यात मांडण्यात आली होती. अभिनेता अजय पूरकरने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. मुळाक्षर प्रॉडक्शन या बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली आहे. रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटाचाही ‘परीक्षकांची पसंती’ अशा विशेष पुरस्काराने गौरव होणार आहे.

कधी : बुधवार, १२ जून २०२४ | कुठे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, घोडबंदर रोड, मानपाडा, ठाणे (पश्चिम) |

केव्हा : संध्याकाळी ६ वाजता | प्रवेश विनामूल्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT