Sakal Premier Awards 2024 eSakal
Premier

Sakal Premier Awards 2024 : ‘प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’ची नांदी... प्रवेशप्रक्रिया आजपासून; चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव

Sakal Premier सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदीतील कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरत आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Premier Awards 2024 : मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’च्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला उद्या (ता. १०) पासून सुरुवात होत आहे. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जूनमध्ये प्रीमियर पुरस्काराचा भव्यदिव्य सोहळा रंगणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रीमियर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.

सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदीतील कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरत आली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीही या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावत असतात. कलाकारांच्या ‘गौरवसंध्या’निमित्त मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रम आणि नृत्य-संगीताच्या सुरेल मैफिलीत सहभागी होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता व अभिनेत्री, दिग्दर्शक, सहायक अभिनेता-अभिनेत्री आदी विविध विभागांत पुरस्कार दिले जाणार आहेत. या सोहळ्याचे प्रक्षेपण मराठी मनोरंजन वाहिनीवर केले जाणार आहे. ‘पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड’ या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत.

गेल्या वर्षी अर्थात १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत चित्रपटांचा प्रीमियर पुरस्कार सोहळ्यासाठी विचार केला जाणार आहे. प्रवेश अर्ज स्वीकारायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय ‘सकाळ माध्यम समूहा’चा असेल. (Premier Awards Registration)

प्रवेश अर्जासाठी संपर्क

पुरस्कार सोहळ्यासाठी आपले प्रवेश अर्ज sakalpremieraward2024@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे. प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ३० मे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३७२४११५०८ आणि ९५९४४९१८२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT