Salman Khan sakal
Premier

Salman Khan: गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणावर पहिल्यांदाच बोलली सलमानची एक्स गर्लफ्रेंड; म्हणाली,"माझी आई आणि मी..."

Salman Khan: गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणाबाबत सलमानची एक्स गर्लफ्रेंड नक्की काय म्हणाली? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली. अशातच आता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडनं या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणाबाबत सलमानची एक्स गर्लफ्रेंड नक्की काय म्हणाली? याबद्दल जाणून घेऊयात...

काय म्हणाली सोमी अली?

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं नुकत्याच एका मुलाखतीत गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "माझ्या ब्रेकअपनंतर मी वयाच्या 24 व्या वर्षी अमेरिकेत आले, हे अनेकांना माहित असेल. काही दिवसांपूर्वी सलमानसोबत जे काही घडत आहे, माझ्या शत्रूला देखीस असा त्रास होऊ नये, असं मला वाटतं. माझ्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. असं कोणाहीसोबत घडू नये, असं मला वाटतं मग ते कुणीही असो, सलमान असो, शाहरुख असो किंवा माझा शेजारी असो."

"सलमान किंवा त्याच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी प्रार्थना करतो. जेव्हा मला आणि माझ्या आईला ही घटना कळली तेव्हा आम्हाला धक्काच बसला.", असंही सोमी म्हणाली.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला अलविदा केल्यानंतर मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचाराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. सोमी ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण दोघांनी नंतर ब्रेकअप केलं. सोमीने बॉलिवूड इंडस्ट्रीत 1993 मध्ये कृष्ण अवतार या ॲक्शन-ड्रामा चित्रपटाद्वारे पदार्पण केले, ज्यामध्ये तिने मिथुन चक्रवर्ती सोबत काम केलं. तसेच तिनं अंत,तीसरा कौन?,आओ प्यार करे या चित्रपटात देखील काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT