Salman Khan esakal
Premier

Salman Khan: 'ईद'निमित्त भाईजाननं चाहत्यांना दिली खास भेट; 'सिकंदर' ची केली घोषणा

Salman Khan: सलमाननं ईदनिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

priyanka kulkarni

Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा दरवर्षी ईदच्या दिवशी चाहत्यांना चित्रपटाची ट्रीट देतो. पण यंदा सलमानचे चाहते नाराज झाले आहेत कारण ईदला त्याचा चित्रपट रिलीज झाला नाही. पण आता सलमाननं ईदनिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. सलमाननं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सलमानच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

सलमाननं केली 'सिकंदर' ची घोषणा

सलमाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या सिकंदर या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमाननं पोस्टमध्ये लिहिलं, "इस ईद 'बड़े मियां छोटे मियां' और 'मैदान' को देखो और अगली ईद सिकंदर से आ कर मिलो... आप सभी को ईद मुबारक!" सलमानच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कधी रिलीज होणार सिकंदर?

ए.आर. मुरुगदास सिकंदर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तसेच या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे. सिकंदर हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार आहे.

साजिद आणि सलमानचे चित्रपट

सिकंदर या चित्रपटाच्या आधी देखील निर्माता साजिद नाडियादवाला आणि सलमान खान यांनी एकत्र काम केले आहे. जुड़वा, मुझसे शादी करोगी, किक या साजिद आणि सलमान यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्यांच्या सिकंदर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ए.आर. मुरुगदास हे त्यांच्या गजनी, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा सिकंदर हा चित्रपट देखील हिट होणार का? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

सलमानचे आगामी चित्रपट

सिकंदर व्यतिरिक्त, किक 2, पठाण वर्सेज टायगर हे देखील सलमानचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update: कंटेनर-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT