samantha ruth prabhu over trolls on her divorce  Sakal
Premier

Samantha Ruth Prabhu : "तुझ्या साध्या नवऱ्याला का फसवलंस? ", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्याला समांथाचं सडेतोड उत्तर

'उ अंटावा' या पुष्पा २ सिनेमातील भन्नाट गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे.

सकाळ वृत्तसेवा

Samantha Ruth Prabhu : 'उ अंटावा' या पुष्पा २ सिनेमातील भन्नाट गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे. समांथाच्या अभिनयासोबतच तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासही नेटकरी खूप उत्सुक असतात. समांथा आणि तिचा पूर्वाश्रमीचा नवरा नागा चैतन्यचा डिव्होर्स हा नेटकऱ्यांचा आवडता विषय.

आजही सोशल मीडियावर या विषयावरून ट्रोलर्स आणि समांथाचे चाहते यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं. २०२१ मध्ये समांथा आणि नागा चैतन्यच डिव्होर्स झाला आणि त्यानंतर तिला मायोसिटीस या गंभीर आजाराचं निदान झालं. त्यानंतर तिने काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेत आजारावर उपचार केले. या घटनेला इतका काळ उलटून गेला तरीही ट्रोलर्स अजूनही समांथाची पाठ सोडत नाहीयेत.

सिनेमांमधून आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकल्यानंतर समांथाने युट्युब चॅनेलही सुरु केलंय. ती युट्युबवर पॉडकास्टच्या माध्यमातून आरोग्याबाबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असते. याचदरम्यान एका युजरने तिला पुन्हा एकदा घटस्फोटावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली.

नेमकं काय घडलं?

समांथाने तिच्या चॅनेलवर मॉर्निंग रुटीनबाबत पॉडकास्ट शेअर केला. या पॉडकास्टची एक पोस्ट तिने इंस्टाग्रामवर सुद्धा शेअर केली होती. या पोस्टवर एका युजरने "मला सांग तू तुझ्या निरागस पतीला का फसवलंस?" असा प्रश्न करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

त्यावर समांथाने "माफ करा या सवयी तुम्हाला उपयोगी पडणार नाहीत. यापेक्षा अधिक चांगल्या उपायांची तुम्हाला गरज आहे. शुभेच्छा. " असं सडेतोड ऊत्तर देत तिने त्या युजरची बोलती बंद केली. तिचं हे उत्तर सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Internet Trolls

'फॅमिली मॅन २' या वेबसिरीजमधून समांथा प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामध्ये तिने साकारलेली दहशतवाद्याची भूमिका सगळ्यांना आवडली. तर तिचा 'शाकुंतलम' हा सिनेमाही खूप गाजला. तिने साकारलेल्या शकुंतला या भूमिकेचं खूप कौतूक झालं. तर तिचा विजय देवरकोंडासोबतच 'कुशी' हा सिनेमाही खूप गाजला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT