Sankarshan Karhade,Rinku Rajguru Esakal
Premier

Sankarshan Karhade: "वचवच, माज , नखरे काही नाही…"; सैराट फेम रिंकू राजगुरुसाठी संकर्षण कऱ्हाडेनं शेअर केली खास पोस्ट

Sankarshan Karhade: संकर्षणनं रिंकूसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला संकर्षणनं खास कॅप्शन दिले आहेत.

priyanka kulkarni

Sankarshan Karhade: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा सध्या नियम व अटी लागू या त्याच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संकर्षणच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाचा प्रयोग काही दिवसांपूर्वी अकलूज येथे झाला. या प्रयोगाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुनं (Rinku Rajguru) तिच्या कुटुंबासोबत हजेरी लावली आहे. संकर्षणनं रिंकूसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला संकर्षणनं खास कॅप्शन दिले आहेत.

संकर्षणनं शेअर केले फोटो

संकर्षणनं रिंकू आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "काल अकलूजचा प्रयोग जोरदार झाला, प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतीसाद मिळाला . almost Houseful होता आणि काल प्रेक्षकांमध्य् स्पेशल गेस्ट पण होती…. रिंकू राजगुरू. मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे .. शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली..” आई बाबांना घेउन आली.. प्रयोग पाहून हसली , रडली , कौतुक करुन गेली..."

"तीचा सैराट आला तेंव्हा “आम्ही सारे खवय्ये” मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. आता चांगले चांगले सिनेमे करते… लोकप्रियता तर काय विचारायलाच नको …. पण तरीही स्वतःहून कळवून , येउन , भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली.. आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत “खवय्ये” मध्ये असं पण म्हणाली.. छान वाटलं. ह्या सगळ्या तीच्या वागण्या बोलण्यात शांतता , स्थीरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती …. वचवच, माज , नखरे काही नाही...Thank you रिंकू तुला खूप शुभेच्छा, भेटत राहु आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे …. त्यांच्या मनांत एकच भाव होता… “आरची आली आरची “, असंही संकर्षणनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

Horoscope Astrology : 'या' 3 राशींचे लोक खूप वर्षे जगतात, उतार वयात मिळतं सगळं सुख..पाहा यात तुमची रास आहे का?

SCROLL FOR NEXT