Narendra Modi oath ceremony SAKAL
Premier

Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी; किंग खान आणि खिलाडी अक्षयच्या 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

Shah Rukh Khan and Akshay Kumar: रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, विक्रांत मेस्सी या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

priyanka kulkarni

Narendra Modi oath ceremony: काल (9 जून) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या भव्य कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आणि मोदींना शुभेच्छा दिल्या.

'या' सेलिब्रिटींना लावली हजेरी

रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, विक्रांत मेस्सी या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. शपथविधी सोहळ्यातील या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुख आणि अक्षयचा फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यातील शाहरुख आणि अक्षयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ANI च्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन शाहरुख आणि अक्षयचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शाहरुख आणि अक्षय हे एकमेकांना गळाभेट करताना दिसले. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "अभिनेते शाहरुख खान आणि अक्षय कुमार राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले, यावेळी त्यांनी एकमेकांना ग्रिट केलं." शाहरुख आणि अक्षय यांच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होता आहे.

एका नेटकऱ्यानं या फोटोला कमेंट केली, "बॉलिवूडचा खिलाडी आणि बादशाह एकाच फ्रेममध्ये" तर दुसऱ्यानं कमेंट केली, "सेलिब्रेटींमधील हे बॉन्डिंग पाहणे नेहमीच आनंददायी असते! अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्यामध्ये खरोखरच चांगली मैत्री आहे, त्यांनी चित्रपटसृष्टीत एकमेकांना समर्थन करण्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे."

शाहरुख आणि अक्षयचे आगामी चित्रपट

शाहरुख खान हा लवकरच त्याच्या 'किंग' या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे, तर अक्षय कुमार हा 'सरफिरा', 'वेलकम टू द जंगल 3'या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान आणि अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT