Sharvari Wagh Audition Esakal
Premier

Sharvari : 'बंटी और बबली २' नाही तर 'या' सिनेमातून शर्वरीने केलं असतं पदार्पण

Sharvari Wagh Audition story : अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या खास ऑडिशनचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला.

सकाळ डिजिटल टीम

Sharvari Wagh : अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या रिलीज झालेल्या 'मुंज्या' सिनेमामुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचं सध्या खूप कौतुक होतंय. 'द फॉरगॉटन आर्मी- आझादी के लिए' या सिनेमातून शर्वरीने अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने 'बंटी और बबली २' हा तिचा पहिला सिनेमा होता. पण तुम्हाला माहितीये का ? 'बंटी और बबली' नाही तर एका बिग बजेट सिनेमातून शर्वरीने पदार्पण केलं असतं. जाणून घेऊया हा किस्सा.

शर्वरीने दिलं 'या' सिनेमांचं ऑडिशन

नुकतंच शर्वरीने बॉलिवूड बबल या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिला तिने कोणकोणत्या सिनेमांच्या ऑडिशन दिल्या होत्या असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शर्वरी म्हणाली,"ऑडिशन्सच्या सुरुवातीच्या काळात आपण कोणत्या सिनेमासाठी ऑडिशन देतोय हे सांगितलं जात नाही. मी 'सुई धागा' सिनेमासाठी ऑडिशन दिलं आहे, मी 'सुलतान' सिनेमासाठी ऑडिशन दिलं आहे. मला एकदा शनु मुखर्जीच्या ऑफिसमधून फोन आला होता. मी ऑडिशनसाठी गेले. त्यावेळी तिथे चर्चा होती कि नेमकं काय विचारतात. तेव्हा कुणीतरी सांगितलं कि आपल्या आवडीनिवडी विचारतात. तेव्हा मी सांगितलं कि, मी इतक्या भाषा बोलते, ही माझी प्रोफाइल आहे असं सगळं सांगितलं होतं. तिथूनच माझा यशराज बरोबरच प्रवास सुरु झाला. त्यानंतर मी बऱ्याच ऑडिशन्स दिल्या. दर दोन-तीन महिन्यांनी मी ऑडिशन्स द्यायचे. सुई-ढगांच्या ऑडिशनवेळी मी ऑडिशनसाठी आलेल्या कलाकारांना क्यू द्यायला मदतही केली होती. त्यावेळी मी कॅमेऱ्याच्या मागे राहून व्हॉइस मॉड्युलेशनच्या मदतीने अनेक पात्र साकारायचे आणि त्यावर कलाकार त्यांचा परफॉर्मन्स द्यायचे. यातून मला बरंच काही शिकायला मिळालं."

मुंज्या सिनेमासाठी शर्वरीचं कौतुक

मुंज्या सिनेमात शर्वरी आणि अभय वर्मा यांची मुख्य भूमिका आहे. पहिल्या दोन दिवसातच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. आदित्य सरपोतदार याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमात सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर आणि रसिका वेंगुर्लेकर यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

आपल्या गावी पहिल्यांदाच आलेला बिट्टू, त्याची गर्लफ्रेंड बेला आणि त्यांच्या मागे पडलेला मुंज्या नावाचं भूत याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT