Sonakshi & Zaheer Wedding Esakal
Premier

Sonakshi & Zaheer Wedding : लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांना कल्पना नाही ; म्हणाले,"आजकालची मुलं..."

Shatrughna Sinha reaction on Sonakshi wedding rumors : अभिनेता शत्रुघ्न सिन्हा सध्या सगळीकडे चर्चा सुरु असलेल्या त्यांच्या मुलीच्या लग्नावर व्यक्त झाले. त्यांना याबद्दल काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi & Zaheer : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जूनला तिचा बॉयफ्रेंड इकबाल झहीरशी लग्न करणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. याबाबत सोनाक्षी किंवा तिच्या बॉयफ्रेंडने कोणतंही अधिकृत वक्तव्य अजून केलं नसलं तरीही सोनाक्षीचे वडील आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया सगळीकडे गाजतेय. लेकीच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल वडिलांना काहीच माहित नसल्याचं समोर येतंय.

शत्रुघ्न लेकीवर नाराज ?

सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरु झाल्यानंतर टाईम्स नाऊने त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना सोनाक्षीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले कि,"सध्या मी दिल्लीत आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर मी अजूनही इथेच राहतोय. माझ्या मुलीच्या लग्नाच्या प्लॅनबाबत माझी काहीही चर्चा झालेली नाहीये. तुम्ही मला विचारलं कि, ती लग्न करतेय का ? तर त्यावर माझं असं उत्तर आहे कि तिने मला अजून काही सांगितलं नाहीये. जितकं मीडियामध्ये बातम्या आल्या आहेत तितकंच मी वाचलं आहे आणि त्याहून जास्त मला माहित नाही. जेव्हा ती मला सांगेल तेव्हा मी तिला माझा आशीर्वाद देईन आणि तिला दुनियेतील सगळे सुख मिळो."

"आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. ती आता मोठी झालीये आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा तिच्या वरातीत मी नाचेन. इतर लोकही मला तिच्या लग्नाबद्दल विचारत आहेत तर मला काहीही माहित नाही उलट मीडियाला जास्त माहित आहे. यावर मी इतकंच म्हणेन कि, आताची मुलं आई-बाबांना विचारत नाहीत फक्त सांगतात. ती आम्हाला कधी सांगतेय याची आम्ही वाट पाहतोय. "

सोनाक्षीच्या लग्नाची जोरदार तयारी

दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांच्या पत्रिकेच्या पहिल्या पानावर 'अफवा खऱ्या आहेत' असं छापण्यात आलं असून लग्नासाठी फॉर्मल ड्रेस थीम ठेवण्यात आलीये. मुंबईतील बॅस्टियनमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे असं म्हंटल जातंय. त्या आधी सोबो हॉटस्पॉटमध्ये लग्न सोहळा रंगणार अशी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

SCROLL FOR NEXT