Shivrajyabhishek Sohala sakal
Premier

Shivrajyabhishek Sohala: भव्य सेट अन् महाराजांच्या भूमिकेत अमोल कोल्हे; 'राजा शिवछत्रपती' मालिकेतील शिवराज्याभिषेक सोहळा डोळे दिपवणारा

Amol Kolhe: अमोल कोल्हे यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Shivrajyabhishek Sohala: छत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवराज्याभिषेक सोहळा" म्हणजे इतिहासातील एक सोनेरी पान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. यानिमित्तानं अमोल कोल्हे यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या 'राजा शिवछत्रपती' (Raja Shivchatrapati) मालिकेतील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आहे.

अमोल कोल्हे यांनी शेअर केला व्हिडीओ

'राजा शिवछत्रपती' या मालिकेतील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "‘शिवराज्याभिषेक‘ दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..." व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाबाई यांच्या भूमिकेत दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांची झलक देखील दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

'राजा शिवछत्रपती'मधील कलाकार

'राजा शिवछत्रपती' या मालिकेचे प्रसारण 2008 मध्ये झाले. या मालिकेचे जवळपास 214 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेतील अमोल कोल्हे यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. मालिकेतील भव्य दिव्य सेट्स आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 'राजा शिवछत्रपती' या मालिकेच्या "जय भवानी जय शिवाजी" या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्याला अजय आणि अतुल यांनी संगीत दिलं होतं. मालिकेचे सेट नितिन चंद्रकांत देसाई यांनी डिझाईन केले होते. तर या मालितेत रुजुता देशमुख, यतीन कार्येकर,नीलम शिर्के यांनी महत्वाची भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT