Siddharth Chandekar esakal
Premier

Siddharth Chandekar: "देऊ का एक थोबाडीत?"; इतका का भडकला सिद्धार्थ चांदेकर? पाहा व्हिडीओ

Siddharth Chandekar: सिद्धार्थच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.

priyanka kulkarni

Siddharth Chandekar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सिद्धार्थच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. अशातच आता सिद्धार्थनं एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सिद्धार्थनं शेअर केला व्हिडीओ

सिद्धार्थनं नुकताच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो लाफ्टर इमोजीबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सिद्धार्थ हा काही स्माइली मितालीला शेअर करतो पण त्यामधील एक स्माइली फोनच्या स्क्रिनवर खालच्या बाजूला दिसतो. या इमोजीबद्दल सिद्धार्थ म्हणतो, ""तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माइलीला थोबाडीत मारावीशी वाटलीये का? म्हणजे बघाना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं. आपल्या खूप हसू येतं मग आपण उत्साहात बरेच स्माइलीचे इमोजी सेंड करतो. पण यावेळी एक स्माइली खालच्या रांगेत जातो. आता तुला काय झालं होतं वर त्यांच्याबरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत?"

पाहा व्हिडीओ:

सिद्धार्थच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

सिद्धार्थनं या मजेशीर व्हिडीओला कॅप्शन दिलं, "सगळ्यांचं होतं का माहीत नाही, मला तर लय राग येतो!" सिद्धार्थच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "सिद्धार्थ कदाचित तुला ओसीडी आहे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "wow सोशल ओसीडी"

सिद्धार्थचे चित्रपट

काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ चांदेकरचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सई ताम्हणकरनं काम केलं आहे. ऑनलाइन बिनलाइन, झिम्मा, झिम्मा 2, ओले आले या चित्रपटांमध्ये देखील सिद्धार्थनं काम केलं आहे. आता सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT