Mahesh Manjrekar: sakal
Premier

Mahesh Manjrekar: 'वास्तव’च्या रिमेकमध्ये दिसणार सिद्धार्थ जाधव? वाचा काय म्हणाले महेश मांजरेकर

Siddharth Jadhav : तो फक्त कॉमेडी करत नाही तर अन्य भूमिकाही तितक्याच सुरेख साकारतो.

सकाळ वृत्तसेवा

Vastav In Marathi: अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वास्तव’ हा हिंदी चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये संजय दत्त, नम्रता शिरोडकर, शिवाजी साटम, संजय नार्वेकर, रिमा लागू या कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

आता या चित्रपटाचा मराठीमध्ये रिमेक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. त्यानिमित्त दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्या ‘वास्तव’ या चित्रपटाचा मराठीमध्ये रिमेक झाल्यास मुख्य भूमिकेत कोणत्या अभिनेत्याला पाहायला तुम्हाला आवडेल...

या प्रश्नावर ते म्हणाले, की आपल्या मराठीमध्ये सगळेच कलाकार चांगले आहेत; पण कुणीही विचारलं तरी माझ्या डोक्यामध्ये लगेच सिद्धार्थ जाधवचं नाव येईल. कारण तो फक्त कॉमेडी करत नाही तर अन्य भूमिकाही तितक्याच सुरेख साकारतो. जेव्हा त्याची लालबाग परळसारख्या सिनेमामध्ये निवड झाली होती,

त्या वेळी अनेकांनी सांगितलं की, त्याला घेणं रिस्की आहे; पण त्या पात्रासाठी तो योग्य होता आणि तो ती भूमिका उत्तमरीत्या निभावेल, या गोष्टीची मला खात्री होती. कारण तो व्हर्सन्टाईल नट आहे. खरं तर सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, कुटुंब अशा काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे ‘वास्तव’च्या मराठी रिमेकमध्ये ते पुन्हा एकत्र आले, तर त्यामध्ये काही वावगं आहे, असे वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT