Premier

Sidharth Malhotra & Kiara Advani : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केल्याचा बनाव, चाहतीकडून उकळले ५० लाख रुपये; नेमकं काय घडलं?

Sidharth Malhotra's fan duped in online scam : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या एका चाहतीची एका ऑनलाईन स्कॅमद्वारे ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sidharth Malhotra : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा मोठा चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थचा महिला चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. सोशल मिडीयावरही त्याचे अनेक चाहते त्याला फॉलो करतात. मात्र सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहती संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही महिला सिद्धार्थ मल्होत्राची इतकी मोठी चाहती आहे की तिने त्याच्यासाठी तब्बल लाखो रुपये दिले आहेत.

सध्या सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटींचे फॅन पेज पाहायला मिळतात. या फॅन पेजला अनेक जण फॉलो देखील करत असता. मात्र अशाच एका फॅन पेजच्या माध्यमातून स्कॅम करण्यात आलाय. ज्यात एका महिलेला सिद्धार्थ मल्होत्राच्या नावे गंडा घालण्यात आलाय. या चाहतीने हा प्रकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून उघडकीस आणलाय. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच या महिला चाहतीला गंडा घालण्यात आला असून तिच्याकडून ५० लाख रुपये उकळण्यात आलेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या एका फॅन पेजवरून हा प्रकार करण्यात आलाय. या फॅन पेजने सिद्धार्थ मल्होत्राचा जीव धोक्यात असल्याचं सांगून या महिलेकडून ५० लाख रुपये घेतले आहेत.

सिद्धार्थची ही महिला चाहती अमेरिकेत राहत असून तिचं नाव मीनू वासुदेव असं आहे. तिने सोशल मिडीयावर सांगितलं की सिद्धार्थच्या फॅन पेजवरून अलीजा आणि हुस्ना या दोन महिलांनी तिच्याकडून सिद्धार्थच्या नावे पैसे उकळले आहेत. तिने या पोस्टमध्ये या प्रकरणाबद्दल आणखी काही खुलासे केले आहेत. कियारामुळे सिद्धार्थचा जीव धोक्यात असून तिने सिद्धार्थवर ब्लॅक मॅजिक केलय. त्यामुळे सिद्धार्थचा कोणताही बँक अकाउंट देखील नसल्याचं या फॅन पेजवरुन सांगण्यात आलं होतं. शिवाय खोट्या पिआर मेंबरर्सशी देखील संवाद घडवून आणला होता. एवढंच नाही तर कियाराचे बनावट टीम मेंबर्स बनवून त्यांच्यासोबतही बोलणी करुन दिली होती. सिद्धार्थशी बोलता यावं यासाठी दर आठवड्याला ही चाहती त्यांना पैसे देत असे. हा सगळा प्रकार चाहती मीनूने सोशल मिडीयावर समोर आणला असून सिद्धार्थला या पोस्टमध्ये टॅग देखील केलय.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये लगीनगाठ बांधली होती. सिद्धार्थ-कियाराचं हे लग्न चांगलच चर्चेत आलं होतं. दोघे काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. 'शेरशाह' या चित्रपटात दोघं एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री पसंत केली गेली. या चित्रपटाची गाणी देखील लोकप्रिय ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT