Premier

Viral Video : राहुलने लेकीला शिकवलं पापराझींना नमस्कार करायला , चिमुकलीच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्स म्हणाले...

Rahul Vaidya's daughter first time spotted at airport : गायक राहुल वैद्यने त्याच्या मुलीबरोबर पहिल्यांदाच एअरपोर्टवर हजेरी लावली यावेळी तिच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

इंडियन आयडॉलचा सेकंड रनर अप असलेला गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्याची गाणी खूप गाजतात. याबरोबरच चर्चा होते ती राहुलच्या वैयक्तिक आयुष्याची. राहुलने दिशा परमार बरोबर लग्न केलं असून त्यांना एक वर्षाची नव्या नावाची मुलगी आहे. नुकताच नव्या आणि राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नुकतंच दिशा, राहुल आणि नव्याला एअरपोर्टवर पापराझींनी स्पॉट केलं. त्यावेळी नव्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. नव्या पहिल्यांदाच तिच्या कुटूंबाबरोबर एअरपोर्टवर दिसली.

विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं की, नव्या आई-बाबांबरोबर एअरपोर्टवर आली तेव्हा सगळ्या फोटोग्राफर्सनी तिला हाक मारली. ती सगळ्यांकडे कुतूहलाने बघत होती. त्यानंतर राहुलने तिला हात जोडायची कृती करून दाखवायला सांगितली पण नव्याने बाबांच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही. नंतर त्याने तिला टाळ्या वाजवून दाखवायला सांगितल्या पण नव्याने त्याकडेही दुर्लक्ष केलं. तेव्हा राहुलने सगळ्यांना आज ती मूडमध्ये नाहीये अस सांगितलं आणि तो पापराझींची चौकशी करून निघाला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत नव्याच्या क्युटनेस कौतुक केलं तर काहींनी नव्याने फोटोग्राफर्सना भाव दिला नाही असं म्हंटलं. तर राहुल आणि नव्याचं बॉंडिंगही अनेकांना आवडलं.

सोशल मिडियावर राहुल लेकीबरोबरचे व्हिडिओ शेअर करत असतो. नव्याच्या अक्टिव्हिटी पाहणं अनेकांना आवडतं.

दरम्यान, दिशा आणि राहुलने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते. दिशा बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. सगळेजण तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT