Singham Again sakal
Premier

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Singham 3: नुकताच सोशल मीडियावर श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

priyanka kulkarni

Singham Again Shooting In Jammu: रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'सिंघम अगेन' या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच या चित्रपटाचं सध्या श्रीनगरमध्ये शूटिंग सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अजय देवगण आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यामधील फायटिंग सीनचं शूटिंग सुरु आहे, असं दिसत आहे. यामध्ये अजय हा पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे तर जॅकी श्रॉफ हे ग्रीन जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहेत. अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल झालेल्या फायटिंग सीनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा पार्ट आहे, याआधी त्याचे सिंघम, सिम्बा,सूर्यवंशी आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता रोहित हा 'सिंघम अगेन' या चित्रपटातून मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

'सिंघम अगेन'ची स्टार कास्ट

रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर हे कलाकार 'सिंघम अगेन' या चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनचा सिंघम अगेन चित्रपटातील लूक रिव्हिल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेतील नववीतल्या विद्यार्थ्याने मित्रावर शस्त्राने केला हल्ला

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT