Srikanth sakal
Premier

Srikanth film Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ ची जादू; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

Srikanth film Box Office Collection: जाणून घेऊयात ‘श्रीकांत’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...

priyanka kulkarni

Srikanth film Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावनं (Rajkummar Rao) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. राजकुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.अशातच राजकुमारचा श्रीकांत हा चित्रपट काल (10 मे) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील राजकुमाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...

बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या ट्रेंडनुसार,'श्रीकांत' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाच्या कमाई वीकेंडला वाढ होईल,असा अंदाज लावला जात आहे.

‘श्रीकांत’ चित्रपटाचे कथानक

‘श्रीकांत’ हा चित्रपट नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि राजकुमारच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

‘श्रीकांत’ची स्टार कास्ट

‘श्रीकांत’ हा चित्रपट जवळपास 40 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

DCM Sunetra Pawar : सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील; पुणे विद्यापीठात २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण

अस्वच्छ किचन पडले महागात! मुंबईतील McDonald’s आउटलेटचा परवाना निलंबित; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT