Stree 2 Teaser Out sakal
Premier

Stree 2 Teaser Out: 'स्त्री 2' चा टीझर ऑनलाइन लीक; हॉरर अन् कॉमेडीच्या जबरदस्त तडका, काय आहे खास? जाणून घ्या...

'स्त्री 2' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

priyanka kulkarni

Stree 2 Teaser Out: 'मुंज्या’ (Munjya) या चित्रपटाच्या शोसोबतच चित्रपटगृहांमध्ये स्त्री-2 (Stree 2) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर एका नेटकऱ्यानं ऑनलाइन लीक केला असू या टीझरमध्ये काही खास गोष्टी दिसत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

तमन्ना भाटियाचा कॅमिओ

पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटिया ही तिच्या 'अरनमानाई 4’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता लवकरच ती ‘स्त्री 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘स्त्री 2’ या चित्रपटात तमन्नाचा कॅमिओ असणार आहे, असं म्हटलं जात आहे.

पाहा टीझर

हॉरर-कॉमेडीचा तडका

‘स्त्री 2’ या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे. ‘हमने आपकी चोटी काट दी थी. गरम तेल से मसाज करेंगी तो फट से वापस आ जाएंगे. हम पलट रहे हैं.. बस आप हमारे कपड़े मत निकालना प्लीज….हम दोस्त हैं ना…।.’, हा राजकुमारचा डायलॉग टीझरच्या शेवटी ऐकू येत आहे.

'स्त्री 2' ची स्टार कास्ट

'स्त्री 2' बद्दल बोलायचे तर राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी हा 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री'चा सिक्वेल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील तीन तास धोक्याचे

Kalhapur Rain update: 'काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार'; पंचगंगेच्या पातळीत वाढ, २१८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

वापरलेल्या खाद्यतेलापासून बनणार विमानाचं इंधन, भारतात पहिला SAF प्लांट सुरू करण्यास इंडियन ऑइलला परवानगी

Asia Cup 2025: आधी खेळ सुधार! बाबर आझमला कोचची स्पष्ट ताकीद; पाकिस्तान संघातून हाकालपट्टीमागचं खरं कारणही सांगितलं

Ranthambore National Park : वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून, ९० मिनिटांत जे घडलं...

SCROLL FOR NEXT