Jacqueliene Fernandez esakal
Premier

Jacqueliene Fernandez: सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पुन्हा लिहिलं पत्र; दिलं 'हे' वचन

Jacqueliene Fernandez: पत्राच्या माध्यमातून सुकेशनं जॅकलिनला तिच्या 'यिम्मी यम्मी' या गाण्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुकेशनं या पत्रातून जॅकलिनला एक प्रॉमिस देखील केलं आहे.

priyanka kulkarni

Jacqueliene Fernandez: 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा अनेकवेळा तुरुंगातून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueliene Fernandez) पत्र लिहित असतो. सुकेश हा या पत्रांमधून अनेकवेळा जॅकलिनवर असणारं त्याचं प्रेम व्यक्त करतो. आता सुकेशनं आणखी एक पत्र जॅकलिनला लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून सुकेशनं जॅकलिनला तिच्या 'यिम्मी यम्मी' या गाण्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुकेशनं या पत्रातून जॅकलिनला एक प्रॉमिस देखील केलं आहे.

सुकेशनं पत्रात काय लिहिलं?

सुकेशनं पत्रात जॅकलिनला तिच्या 'यिम्मी यम्मी' या नव्या गाण्याच्या लॉन्चबद्दल अभिनंदन केले. एवढेच नाही तर त्याने हे गाणे सर्वाधिक वेळा पाहणाऱ्या टॉप 100 लोकांसाठी बक्षीस देखील जाहीर केली. सुकेशने पत्रात जॅकलिनला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्याचे वचन दिले आहे.

सुकेशने गेल्या वर्षी देखील जॅकलिनला एक पत्र लिहिले होते. ज्यात त्याने जॅकलिनला पुढचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचे आश्वासन दिले होते.

दोनशे कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या सुकेशवर बरेच आरोप करण्यात आले आहेत. सुकेशनं जॅकलिनला काही भेटवस्तू अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या.

जॅकलिननं केली होती तक्रार

काही दिवसांपूर्वी जॅकलिननं सुकेशच्या विरोधात तक्रार केली होती. सुकेश मला धमक्या देत असून त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत, असे जॅकलिननं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र आता तिनं तिची तक्रार मागे घेतली आहे.

जॅकलिनचं 'यिम्मी यम्मी' हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेकजण या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT