Sunidhi Chauhan ESAKAL
Premier

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Sunidhi Chauhan: सुनिधीच्या कॉन्सर्टमधील परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की, एका प्रेक्षकाने तिच्यावर बाटली फेकली.

priyanka kulkarni

Sunidhi Chauhan: गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) ही तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. सुनिधीचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आहे. सुनिधीच्या कॉन्सर्टचे आयोजन विविध शहरात केले जाते. काही दिवसांपूर्वी सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टचे आयोजन डेहराडूनमधील कॉलेजमध्ये करण्यात आले होते. अशातच सुनिधीच्या या कॉन्सर्टमधील परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दिसत आहे की, एका प्रेक्षकाने तिच्यावर बाटली फेकली.

प्रेक्षकानं सुनिधीला फेकून मारली बॉटल

सोशल मीडियावर सुनिधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुनिधी ही स्टेजवर परफॉर्म करत आहे. यादरम्यान प्रेक्षकांमधील एक व्यक्ती सुनिधीला बॉटल फेकून मारतो. तरीही सुनिधी तिचं गाणं थांबवत नाही. ती गात राहते आणि गाण्याच्या काही ओळी गायल्यानंतर ती बॉटल फेकून मारणाऱ्याला सडेतोड उत्तर देते.

सुनिधीनं दिलं सडेतोड उत्तर

"हे काय होत आहे? बाटली फेकल्यानं काय होईल? शो थांबेल, तुम्हाला शो थांबवायचा आहे का?", असं सुनिधी बॉटल फेकणाऱ्या प्रेक्षकाला म्हणाली.

पाहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सुनिधीचा कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुनिधीचं कौतुक करण्यास सुरुवात केली. ही घटना अगदी सहजपणे हाताळल्याने सुनिधीचं नेटकऱ्यांनी कौतुक केल आहे. तसेच काही नेटकरी बॉटल फेकून मारणाऱ्या व्यक्तीवर भडकले.

सुनिधीनं तिच्या कॉन्सर्टमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला सुनिधीनं कॅप्शन दिलं, "तुम्ही माझ्या पार्टीला आला आहात का??? माझी पार्टी अशी दिसते."

सुनिधीनं अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, गुजराती आणि आसामी भाषेतील गाणी सुनिधीनं गायली आहे. शिला की जवानी, देसी गर्ल, बीडी जलाईले या सुनिधीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT