Suniel Shetty Esakal
Premier

Suniel Shetty : दिलदारपणा कि लाच ? लाडक्या लेकीला सिनेमा मिळाल्यानंतर सुनील शेट्टीने कास्टिंग दिग्दर्शकाला गिफ्ट केला बंगला

Suniel Shetty gift to casting director : अथिया शेट्टीला पहिला सिनेमा मिळाल्यानंतर सुनील शेट्टी यांनी कास्टिंग दिग्दर्शकाला बंगला गिफ्ट केला. काय हा किस्सा जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर हिंदी बरोबरच साऊथ इंडस्ट्रीतही स्वतःची ओळख बनवली आहे. सुनीलच्या मुलीने अथियाने 'हिरो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतीच सिनेविश्वातील आघाडीचा कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्राने याबाबतची आठवण एका मुलाखतीमध्ये शेअर केली.

मुकेश छाब्रा यांनी नुकतीच भारती सिंहच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी मुकेश यांनी सुनील शेट्टीची एक आठवण सांगितली. त्यांनी असं सांगितलं कि, जेव्हा सुनीलची मुलगी अथियाची निवड हिरो सिनेमासाठी झाली तेव्हा मुकेशच्या ऑफिससाठी सुनीलने त्याचा बंगला दिला. हा किस्सा चर्चेत होता.

मुकेश यांनी सांगितलं कि,"जेव्हा माझं कास्टिंग दिग्दर्शक म्हणून करिअर बहरत होत त्यावेळी सुनील शेट्टी यांनी मला मदत केली. मुंबईत राहणाऱ्या कलाकारांपैकी ते बेस्ट कलाकार आहेत. त्यांचा आराम नगरला १६० नंबरचा बंगला होता. त्यावेळी मी त्यांची मुलगी अथियाबरोबर हिरो या सिनेमासाठी काम करत होतो. त्यावेळी ते मला म्हणाले कि, तू इतक्या लहान ऑफिसमध्ये का काम करतोयस, माझा आराम नगरमध्ये बंगला वापर. मी खूप दबावात होतो. ते मला म्हणाले कि, काही काळजी करू नको फक्त चांगलं काम करत राहा. त्यांनी केलेली ही चांगली काम कधीच कुणाला सांगितलीनाहीत . त्यांनी मला त्यांचा आराम नगरमधील मोठा बंगला वापरायला दिला. त्यांनी मला भाड्याविषयी अजिबात चिंता करू नकोस असं सांगितलं. तू माझ्या मुलींसाठी इतकं केलंस प्लिज हा बंगला वापर असं त्यांनी त्यावेळी सांगितलं."

अथियाने हिरो या सिनेमातून पदार्पण केलं होतं. २०१५ साली हा सिनेमा रिलीज होता. या सिनेमात अभिनेता सूरज पंचोलीची मुख्य भूमिका होती. तर तिचा भाऊ अहानने तडप या सिनेमातून पदार्पण केलं. त्याचा लवकरच नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT