Suniel Shetty sakal
Premier

Suniel Shetty: "कुणी काय आणि किती खाल्लं ते सगळं मला माहित होतं..."; अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत सुनील शेट्टीनं केला खुलासा

Athiya Shetty and KL Rahul Wedding: सुनीलनं सांगितलं की, अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नसोहळ्याला केवळ 70 पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

priyanka kulkarni

Suniel Shetty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टीने (Athiya Shetty) गेल्यावर्षी क्रिकेटर केएल राहुलसोबत (KL Rahul) लग्नगाठ बांधली. अथिया आणि केएल राहुलच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टीनं अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नसोहळ्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी सुनीलनं सांगितलं की, अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नसोहळ्याला केवळ 70 पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत काय म्हणाला सुनील शेट्टी?

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये 23 जानेवारी 2023 रोजी अथिया आणि केएल राहुल यांचा लग्नसोहळा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अथिया आणि केएल राहुल लग्न बंधनात अडकले. अशातच आता एका मुलाखतीत सुनील शेट्टीनं अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नसोहळ्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "लग्नात 70 लोक होते आणि लग्न घरातच पार पडले. सर्व सोहळा घरीच झाला आणि टिया (अथिया) लाही सर्व कार्यक्रम घरीच करायचे होते. अनेक लोक म्हणू लागले की, लग्न असंच व्हायला पाहिजे. मुलेचे कुटुंब आणि मुलाचे कुटुंब मिळून एकूण 70 लोक लग्नसोहळ्याला उपस्थित होते."

"लग्नात आलेल्या प्रत्येकाने काय खाल्ले आणि किती खाल्ले हे मला माहीत होते. आम्ही 5000 लोकांना आमंत्रित केलं असतं तर आम्हाला प्रत्येकाची विचारपूस करता आली नसती.", असंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं.

सुनील शेट्टीची मुलगी अथियानं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT