Supriya Sule esakal
Premier

Supriya Sule: "हे गृह खात्याचे अपयश.."; सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे (Bandra) येथील निवासस्थानाबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. या घटनेवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

priyanka kulkarni

Supriya Sule: बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे (Bandra) येथील निवासस्थानाबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मुंबई पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. गोळीबार करणाऱ्या व्यक्तींचा पोलीस शोध घेतल आहेत. आता या संपूर्ण घटनेवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,"गृह खात्याचे अपयश आहे"

सुप्रिया सुळे ANI सोबत बोलताना म्हणाल्या, "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे."

"आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो, हे खूप सुशिक्षित ठिकाण आहे जिथे लोक शांततेत राहतात, पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे. मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे.", असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना ओळखण्यासाठी आम्ही परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. 3 राऊंड फायरिंग करण्यात आलं, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. घटनेनंतर क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर झाली असून गोळ्यांच्या खुणा तपासत आहेत.

सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गर्दी करतात. ईदनिमित्त सलमाननं त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT