Swatantrya Veer Savarkar esakal
Premier

Swatantrya Veer Savarkar: 'मडगांव एक्स्प्रेस'ला बॉक्स ऑफिसवर टक्कर देतोय 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट; किती केली कमाई? जाणून घ्या कलेक्शन

Swatantrya Veer Savarkar: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटासोबत टक्कर झाली.

priyanka kulkarni

Swatantrya Veer Savarkar: अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 22 मार्च रोजी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात विनायक दामोदर सावरकर यांचा संघर्ष आणि लढा दाखवण्यात आला आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटासोबत टक्कर झाली. दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात...

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटींचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाला रविवारच्या सुट्टीचा फायदा झाला, चित्रपटाने 2.7 कोटींचा व्यवसाय केला. आता चौथ्या दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ही 8.25 कोटी झाली आहे.

'मडगाव एक्सप्रेस' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

बॉक्स ऑफिसवर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटानं चार दिवसांत एकूण 8.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाला टक्कर देत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर'ने चार दिवसांत 8.25 कोटींची कमाई केली आहे, तर 'मरगाव एक्स्प्रेस'ने आतापर्यंत 9.65 कोटींचा व्यवसाय केला आहे.

रणदीप हुड्डा यांनी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडे देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडेने वीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारली आहे. याशिवाय अमित सियालही या चित्रपटात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT