Chandrakanth 
Premier

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Telugu actor Chandrakanth Died:अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या करुन जीवन संपल्याचं समोर आलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या करुन जीवन संपल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री पविथ्रा जयराम हिचा काही दिवसांपू्र्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर चंद्रकांत याने तेलंगणाच्या अलकापूरमधील घरी आत्महत्या केली आहे. चंद्रकांत याच्या मृत्यूने तेलगु चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत आणि पविथ्रा गेल्या सहा वर्षांपासून सोबत राहत होते.

चंद्रकांत हा डेली सोपमधील कामासाठी ओळखला जायचा. चंद्रकांत याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो तणावामध्ये होता. सहकलाकार पविथ्रा हिच्या मृत्यनंतर तो दु:खात होता. यातून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. चंद्रकांत हा इंडस्ट्रीमध्ये चंदू नावाने ओळखला जायचा. 'त्रिनयनी' या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता.

चंद्रकांत याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच घरी तो पविथ्रासोबत राहत होता. प्राथमिक रिपोर्टनुसार, पविथ्रा हिच्या मृत्यूमुळे त्याला मोठा धक्का बसला होता. पविथ्रा आणि चंद्रकांत यांच्यामध्ये घट्ट भावनिक संबंध होते. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. तेलगु मनोरंजन सृष्टीवर दुहेरी दु:ख कोसळलंय असंच म्हणावं लागेल.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रकांत याने सांगितलं होतं, की तो पविथ्रासोबतच्या संबंधाना अधिकृत नात्यामध्ये रूपांतरित करणार आहे. पविथ्रा जयराम ही सिरियलमध्ये काम करायची. तिचं लग्न झालं होतं, पण तिने घटस्फोट घेतला होता. तिला दोन मुलं आहेत. चंद्रकांत याचंही लग्न झालंय, त्यालाही दोनं मुलं आहेत. दोघांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT