GOAT Thalapathy Vijay To Become Of Tamil Nadu CM In 2026 Esakal
Premier

GOAT Thalapathy Vijay: सुपरस्टार अभिनेता होणार मुख्यमंत्री, सहकाऱ्याचं भाकीत अन् सांगितला प्लॅन

GOAT Thalapathy Vijay:: अभिनेता थलापती विजयने अभिनयाबरोबर राजकाणातही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच राजकीय पक्ष स्थापन केला होता.

आशुतोष मसगौंडे

विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' आज म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रेमगी अमरेन देखील मुख्य भूमिकेत आहे.

दरम्यान विजयचा सहकलाकार अमरेनने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तसेच विजयाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमरेला खात्री आहे की, विजय 2026 मध्ये तामिळनाडूचा मुख्यमंत्री होईल.

अभिनेता थलापती विजयने अभिनयाबरोबर राजकाणातही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच राजकीय पक्ष स्थापन केला होता.

थलापती विजयच्या राजकारणातील प्रवेशाबाबत बोलताना प्रेमगी म्हणाले, "हो, 2026 मध्ये मी त्याला मत देईन. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की विजय 2026 मध्ये तामिळनाडूचा मुख्यमंत्री होईल. वेट अँड वॉच."

हिंदुस्तान टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेमगीने बहुप्रतिक्षित चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT)' मधील त्याच्या भूमिकेबद्दलही सांगितले. या चित्रपटातील विजयच्या डबल रोलबाबत रंजक माहितीही सांगितली.

प्रेमगीच्या या विधानांमुळे सिनेमा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील विजयचे भविष्यातील कामगिरी कशी असले याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. चित्रपटाचा रनटाइम तीन तासांचा आहे. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विजयचा राजकीय पक्ष

थलापती विजयने फेब्रुवारी 2024 मध्ये तमिझगा वेत्री कळघम नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाचे अध्यक्षपद विजयकडेच असून, राज्य आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे याची नोंदणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या पायनूर येथील पक्षाच्या मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात विजयने पक्षाचा ध्वज आणि प्रतीक अधिकृतपणे प्रकाशीत केले होते. यावेळी पक्षाचे गीतही प्रदर्शीत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT