The Family Man 3 esakal
Premier

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

The Family Man 3: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

priyanka kulkarni

The Family Man 3: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' (The Family Man 3) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या वेब सीरिजबाबत एक अपडेट समोर आली आहे. नुकतीच मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मनोज यांनी चाहत्यांना दिली आहे.

मनोज बाजपेयी यांनी शेअर केली पोस्ट

मनोज बाजपेयी यांनी 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीरिजबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामधील एका फोटोमध्ये क्लॅप बोर्ड दिसत आहे, ज्यावर TFM 3 असं लिहिलेलं दिसत आहे. याचा अर्थ 'द फॅमिली मॅन-3' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मनोज बाजपेयी यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मनोज बाजपेयी, सुमन कुमार, राज आणि डीके यांची फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.

द फॅमिली मॅन 3 ची स्टार कास्ट

द फॅमिली मॅन 3 या वेब सीरिजची निर्मिती राज आणि डीके यांनी केली आहे. या जोडीने वेब सीरिजचे दिग्दर्शनही केले आहे. सुमन कुमार, राज आणि डीके यांनी द फॅमिली मॅन 3 ची कथा लिहिली आहे. वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज बाजपेयी व्यतिरिक्त प्रियामणी (सुचित्रा तिवारी), शरीब हाश्मी (जेके तळपदे), अश्लेषा ठाकूर (धृती तिवारी) आणि वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

Mumbai News: 'ती' चारचाकी आयात नव्हे! उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT