Bollywood actress  Esakal
Premier

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये एकेकाळी आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीची प्लास्टिक सर्जरीने लावली वाट ; जाणून घ्या ती सध्या काय करते ?

Bollywood disappeared actress story : एकेकाळी आपल्या सौंदर्याने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं करिअर चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे संपुष्टात आलं.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News : प्लास्टिक सर्जरी हा शब्द बॉलीवूडला काही नवा नाही. आजवर अनेक कलाकारांनी अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला आहे. काही याविषयी उघडपणे बोलले आहेत तर काहींनी यावर भाष्य करणं टाळलं. पण बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री होती जिच्यावर प्लास्टिक सर्जरीचा असा परिणाम झाला ज्यामुळे तिला बॉलिवूड सोडावं लागलं. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.

२००४ मध्ये मुसाफिर या सिनेमातून अभिनेत्री कोयना मित्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने या सिनेमात केलेला 'साकी साकी' हा आयटम नंबर सुपरहिट झाला आणि नंतर सगळीकडे तिचीच चर्चा होऊ लागली. तिच्या सौंदर्याचे आणि बोल्ड अदांचे अनेकजण फॅन झाले. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या कोयनाने अनेक स्पर्धा जिंकल्या असून ती काही फॅशन ब्रँडची आघाडीची मॉडेल राहिली होती. तर बॉलिवूडमध्येही तिने नाव कमावलं.

रितेश देशमुख, संजय दत्त, श्रेयस तळपदे, फरदीन खान, अक्षय कुमार यांसारख्या बड्या स्टार्सबरोबर तिने सिनेमांमध्ये काम केलं. तिचे आयटम नंबर खूप चर्चेत होते पण सगळ्यात तिचा गाजलेला सिनेमा म्हणजे 'अपना सपना मनी मनी'. तिचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता अनेकांना तिचा अभिनयही आवडला. त्यानंतरही तिने काही सिनेमात काम केलं तर काही सिनेमात आयटम नंबरपुरतीच दिसली. तिने तिच्या कारकिर्दीमध्ये ११ बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं तर काही बंगाली आणि तामिळ सिनेमेही केले.

पण एका प्लास्टिक सर्जरीमुळे कोयनाचं आयुष्य बदललं. अधिक सुंदर दिसण्यासाठी कोयनाने तिच्या चेहऱ्यावर एक सर्जरी केली पण त्याचा परिणाम उलटा झाला. या सर्जरीमुळे तिचा चेहरा पूर्ण खराब झाला. ही सर्जरी फेल झाल्यामुळे तिने चेहऱ्यावर आणखी एक सर्जरी केली जिला रायनोप्लास्टी म्हंटलं जातं. पण त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूप सूज आली. याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.

ती म्हणाली,"प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. सर्जरी झाल्यानंतर माझ्या चेहऱ्याला खूप सूज आली होती. माझ्या चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास एक वर्षाचा कालावधी गेला. तोपर्यंत माझा चेहरा पाण्याने भरला असा असा दिसायचा." असा खुलासा तिने केला. या फेल सर्जरीचा परिणाम कोयनाच्या करिअरवर झाला आणि तिला प्रोजेक्ट मिळणं बंद झालं. त्यानंतर कोयना कोणत्याच बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. अखेरची ती बिग बॉस सीजन १३ मध्ये दिसली होती पण प्रेक्षकांनी तिला पहिल्याच आठवड्यात बाहेरचा रस्ता दाखवला.

सध्या कोयना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करते. पण ती कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT