Premier

Aye Haye Oye Hoye Trending Song : 'आये हाय ओये होये' या ट्रेंडिंग गाण्याचा गायक अखेर सापडला; "या गाण्यामुळे माझं करिअर बर्बाद" असं का म्हणाली अभिनेत्री?

Aye Haye Oye Hoye Trending Song : सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडमध्ये असलेल्या 'आये हाय ओये होये' गाण्याचा गायक अखेर सापडलाय. जाणून घेऊया या व्यक्तीविषयी.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर 'आये हाय ओये होये' हे गाणं खूप ट्रेंडमध्ये आहे. हे गाणं नाही सुरात आहे नाही तालात तरीही ही हे गाणं खूप गाजतंय. इंस्टाग्रामवर या गाण्यावर एंक रील्स आणि मिम्स बनत आहेत. या गाण्यावर एक व्यक्ती आणि तरुणी नाचताना दिसतेय आणि ती व्यक्ती हे गाणं गाताना दिसतेय. पण ही सध्या व्हायरल झालेली व्यक्ती नक्की आहे कोण जाणून घेऊया.

हे व्हायरल झालेलं गाणं गाणाऱ्या व्यक्तीच नाव चाहत फतेह अली खान आहे. यांना त्यांच्या वेगळ्या संगीतासाठी ओळखलं जातं. हे गाणं मूळ नूर जहाँ यांनी गायलं होत तर चाहत यांनी या गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या युट्युब चॅनेलवर शेअर केलं. या गाण्यात त्यांच्यासोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नाव वजदान राव रांगड़ असून ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. चाहत यांनी शेअर केलेलं हे गाणं आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे.

पहा गाणं:

हे गाणं रिलीज झाल्यावर लगेच व्हायरल झालं आणि आता या गाण्यावर खूप रील्स बनत आहेत. अनेकप्रकारच्या रील्स साठी हे गाणं वापरलं जात आहे. पण इतकी प्रसिद्धी मिळूनही या गाण्यात काम करणाऱ्या वजदान रांगड या अभिनेत्रीचं म्हणणं आहे कि या गाण्याने तिचं करिअर खराब केलं आहे. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं कि"दुर्दैवाने मी या गाण्यावर डान्स केला आणि आता लोक मला ट्रोल करत आहेत आणि मला जाब विचारत आहेत कि मी हे गाणं का स्वीकारलं. मी त्यावर उत्तर दिलं कि माझ्याकडे ईदला कपडे खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते आणि चोरी करण्यापेक्षा हे तर नक्कीच चांगलं आहे. "

कोण आहे चाहत फतेह अली खान?

चाहत फतेह अली खान हे लाहोर मध्ये राहतात. त्यांचं वय ५६ वर्षं असून कोविड काळातही त्यांच्या गाण्यांची बारीची चर्चा झाली होती. त्यांच्या गाण्यांवर लोक लगेच मिम्स बनवतात यामुळे त्यांची एक वेगळी ओळख बनलीय.

पाकिस्तानी टीव्ही शोजमध्येही त्यांना आतापर्यंत बऱ्याचदा बोलवलं गेलं आहे. अनेक चॅनेल्समध्ये त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. पीएनएन फिजा रियाज आणि वजाहत खान याना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं कि त्यांना एक गाणं लिहून, त्याला संगीत देऊन त्याच रेकॉर्डिंग आणि रिलीज करण्यासाठी त्यांना फक्त एक आठवड्याचा अवधी लागतो.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT