So Long Valley Movie Review 
Premier

Movie Review : सो लाँग व्हॅली - आश्चर्याचा धक्का; पण नावीन्याचा अभाव

So Long Valley Movie Review : सो लाँग व्हॅली सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.

Santosh Bhingarde

  1. ‘सो लाँग व्हॅली’ ही एका अपहरण झालेल्या मुलीच्या तपासाभोवती फिरणारी रहस्यकथा आहे.

  2. सिमला आणि मनाली या थंड डोंगरी भागात घडणाऱ्या कथेत रहस्य, गुंतागुंत आणि थरार यांचा सुरेख मेळ आहे.

  3. पोलिस तपास करताना येणाऱ्या अडथळ्यांचा आणि गुन्हेगारी मानसिकतेचा तपशीलवार वेध या चित्रपटात घेतला आहे.

Marathi Entertainment News : दिग्दर्शक व निर्माते मान सिंग यांचा क्राईम थ्रिलर चित्रपट 'सो लाँग व्हॅली' प्रदर्शित झाला आहे. एका अपहरण झालेल्या मुलीचा पोलिस कशा पद्धतीने तपास करतात. त्यांना त्यावेळी कशा प्रकारचे अडथळे येतात याची ही कहाणी आहे.

सिमला आणि मनाली या परिसरात घडणारी ही कथा आहे. या कथेमध्ये गुंतागुंत, रहस्य आणि थरार यांची सांगड उत्तम घालण्यात आली आहे. कथेला सुरुवात होते ती मनाली पोलिस ठाण्यातून. एक घाबरलेली आणि भयभीत झालेली मुलगी पोलिस ठाण्यात येते आणि आपली बहीण कित्येक तास झाले तरी घरी नाही आली अशी तक्रार नोंदवते.

तिच्या बहिणीचे नाव रिया (आकांक्षा पुऱी) असते. ती सिमला येथे शिक्षिका असते आणि तेथून ती आपल्या घरी निघालेली असते. परंतु ती घरी आलीच नाही म्हणून तिची बहीण पोलिस ठाण्यात तक्रार देते. मग मनाली पोलिस आणि सिमला पोलिस या आपल्या तपासाला सुरुवात करतात. सुरुवातीला पोलिसांना एका टॅक्सी ड्रायव्हरवर संशय येतो आणि त्या दृष्टीने ते तपासाला सुरुवात करतात. मग हळूहळू यातील एकेक रहस्य उलगडत जाते. त्यानंतर जसजसा तपास खोलवर जातो तसतसा आपल्याला धक्का बसतो.

हा चित्रपट म्हणजे क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. कथेतील गुंतागुंत आणि रहस्य छान टिपण्यात आले आहे. विशेष म्हणजे क्लायमॅक्सला जेव्हा रहस्याची उकल होते तेव्हा आपल्याला धक्का बसतो.

दिग्दर्शक मान सिंग यांनी या रहस्याची बांधणी छान केली आहे. त्रिधा चौधरी, मान सिंग, आकांक्षा पुरी, विक्रम कोचर, आलिशा परवीन आदी कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. विशेष बाब म्हणजे विक्रम कोचरने एका सायको टॅक्सीचालकाची भूमिका उत्तम साकारली आहे. त्रिधा चौधरीने सुमन नेगी या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका लिलया पेलली आहे. पोलिस अधिकारी म्हणून तपासातील बारकावे, त्या अनुषंगाने गुन्ह्याची करण्यात येणारी उकल या बाबी तिने पडद्यावर छान टिपल्या आहेत.

मान सिंग यांनीदेखील आपल्या अभिनयाची चुणूक चांगली दर्शविली आहे. सिमला आणि मनाली येथील नयनरम्य दृश्ये सिनेमॅटोग्राफर यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. हिमाचल प्रदेशातील ही नयनरम्य दृश्ये मनाला भुरळ घालणारी आणि डोळ्यांना सुखद आनंद देणारी आहेत. चित्रपटाच्या कथेमध्ये फारसे नावीन्य नसले तरी काही बाबी निश्चितच उल्लेखनीय आहेत. चित्रपटातील संवाद ठिकठाक असले तरी चित्रपट पाहताना फारशी उत्कंठा वाटत नाही. शिवाय संगीताची उणीव जाणवते. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. एकूणच हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे आणि या चित्रपटाच्या कथेमध्ये नावीन्याचा अभाव आहे.

‘सो लाँग व्हॅली’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

मान सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

चित्रपटाची कथा कोणत्या भागात घडते?

कथा सिमला आणि मनाली या डोंगराळ भागात घडते.

हा चित्रपट कोणत्या प्रकारात मोडतो?

‘सो लाँग व्हॅली’ हा क्राईम थ्रिलर प्रकारात मोडणारा चित्रपट आहे.

चित्रपटातील मुख्य विषय काय आहे?

एका अपहरण झालेल्या मुलीचा तपास आणि त्यात येणारे अडथळे हा मुख्य विषय आहे.

चित्रपटात कोणत्या भावनांचा प्रभाव दिसतो?

गुंतागुंत, रहस्य आणि थरार यांचा प्रभावपूर्ण संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT