Tripti Dimri Esakal
Premier

Tripti Dimri: "ती खूप धाडसी आहे," तृप्ती डिमरी 'या' अभिनेत्रीला मानते आपला आदर्श

Priyanka Chopra: "आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे ही मोठी गोष्ट आहे आणि तिने दुसऱ्या देशात जाऊन पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. म्हणून मला ती खूप धाडसी व्यक्ती वाटते."

सकाळ डिजिटल टीम

Tripti Dimri On Priyanka Chopra:

भारतीय चित्रपट सृष्टीवर आपली छाप सोडलेल्या रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटातून अभिनेत्री तृप्ती डिमरी घराघरात पोहचली. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तृप्तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि बॉलिवूडमधील तिची प्रेरणास्थान प्रियांका चोप्रा विषयी मोकळेपणाने बोलताना दिसली.

अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, तृप्तीला विचारण्यात आले की, तिच्या आयुष्यावर कोणाचा सर्वात जास्त प्रभाव आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणली, 'माझ्या आयुष्यावर माझ्या बहिणीचा खूप प्रभाव आहे. ती जशी तिचे वैयक्तिक आयुष्य आणि काम यात समतोल राखते, तसाच समतोल मलाही माझ्या आयुष्यात राखायचा आहे.

या मुलाखतीवेळी अभिनेत्री तृप्तीला, ती बॉलिवूडमध्ये कोणाला आदर्श मानते असा प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावर तृप्तीने उत्तर दिले की, "बॉलिवूडमध्ये ती प्रियंका चोप्राला आदर्श मानते. तिचा 'बर्फी' चित्रपट मला खूप आवडतो. आणि तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे."

पुढे बोलताना तृप्ती म्हणाली की, " 'बर्फी पाहताना मला प्रियांका चोप्रा कळाली. आणि कोणत्याही अभिनेत्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने साकारलेल्या पात्रात हरवून जाणे.'

एवढेच नाही तर प्रियांका चोप्राच्या आत्मविश्वासाने तृप्ती खूप प्रभावित आहेत. ती म्हणते, 'आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे ही मोठी गोष्ट आहे आणि तिने दुसऱ्या देशात जाऊन पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. मला प्रियंका चोप्रा खूप धाडसी व्यक्ती वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT