Zee Marathi Serial Esakal
Premier

Viral Video : 'या' गाजलेल्या मराठी मालिकेचं इंग्रजी डबिंग ऐकून नेटकऱ्यांना हसू अनावर ; व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

Tu Tevha Tashi English dub video went viral : झी मराठीवर गाजलेली 'तू तेव्हा तशी' या मालिकेचं इंग्रजी डब व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tu Tevha Tashi : झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' ही मालिका खूप गाजली होती. स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा चाहतावर्ग अजूनही टिकून आहे. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आता इंग्रजी मध्ये डब करण्यात आली आहे. झी आफ्रिका या चॅनेलवर ही मालिका 'नेव्हर टू लेट फॉर लव्ह' या नावाने ही मालिका प्रसारित करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या मालिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ

तू तेव्हा तशी मालिकेतील अनामिकेच्या गृह्प्रवेशाचा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच इंग्रजी डब ऐकून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हे डबिंग खूप विचित्र वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हंटलं कि,"मराठी डेली सोप्सच्या इंग्रजी डब केलेल्या व्हर्जन्स खूप विचित्र वाटतात. ते झी आफ्रिकेवर दाखवत आहेत." तर अनेकांनी ते मराठी सण, उत्सव हे इंग्रजीमध्ये कसं दाखवणार आहेत हा प्रश्नही मला पडलाय असं म्हंटलं.

व्हिडीओवरील प्रतिक्रिया

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वतः अभिज्ञानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "अनंतापर्यंत" अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे तर एकाने 'फोडणीचा भात काय असतो ?' असा प्रश्न केलं आहे तर एकाने "या व्हिडिओमधील आजी १६ वर्षाच्या मुलीच्या आवाजात का बोलतेय ?" असा प्रश्न केला आहे .

Audience Reaction

या आधीही अनेक मराठी मालिकांचं हिंदीमध्ये डब करण्यात आलं आहे. 'जुळून येति रेशीमगाठी','होणार सून मी या घरची','एका लग्नाची तिसरी गोष्ट' या गाजलेल्या मराठी मालिका डब करून हिंदी चॅनेलवर दाखवण्यात येत आहेत आणि तिथेही या मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण गाजलेल्या मराठी मालिकांचं झालेलं इंग्रजीकरण प्रेक्षकांना फारसं झेपलेलं दिसत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : श्री दत्तात्रयांचे आजोळ असलेल्या कर्दमाश्रमात श्रीदत्त जयंती निमित्त भाविकांची मांदीयाळी

Ashes: हुश्श, विवस्त्र होण्यापासून वाचलो! शतक केलं जो रुटने, पण प्रचंड आनंदी झाला ऑस्ट्रेलियाचा हेडन; पाहा Video

Wakad Bus Accident : वाकडमध्ये पुन्हा मद्यधुंद बसचालकाचा कहर; विरुद्ध दिशेने येत मोटार व रिक्षेला जोरदार धडक; मोटारचालक जखमी; बसचालकावर गुन्हा दाखल!

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

SCROLL FOR NEXT