Twinkle Khanna Miss Her Periods Pregnancy After Age 50  
Premier

प्रेग्नेंट की..? वयाच्या पन्नाशीत Periods मिस होण्याच नेमका अर्थ काय? ट्विंकल खन्ना गोंधळली

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ट्विंकल खन्ना पुन्हा प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ट्विंकल खन्ना चांगलीच चर्चेत आली आहे. ती पुन्हा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने स्वतःच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं ट्विटकल बद्दल बॉलिवूडच्या जगात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

तर नेमका विषय आहे तरी काय?

ट्विंकल खन्नाला तिच्या अभिनय कारकिर्दीत फार लोकप्रियता मिळवता आली नाही. पण लेखिका म्हणून तिला नवी ओळख मिळाली. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करते. यावेळी ट्विंकल खन्ना तिच्या प्रेग्नेंसीच्या न्यूजमुळं चर्चेत आली आहे.

दोन दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे चाहतेदेखील गोंधळल्याचे पाहायला मिळत आहे. ती प्रेग्नंट आहे की नाही हे अशा पेचात तिचं चाहते अडकले आहेत.

ट्विंकलने व्हिडिओमध्ये गर्भधारणा, पेरीमेनोपॉज क्लब, रजोनिवृत्ती आणि चिंता यांचाही उल्लेख केला आहे. त्यामुळं चाहते व्हिडीओवर कमेंट करत नेमकं काय झालं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अभिनेत्रीनं व्हिडीओमध्ये संभ्रम व्यक्त केला आहे. 'जेव्हा तुमची मासिक पाळी उशीरा येते, तेव्हा तुम्ही गोंधळात पडता की हे मेनोपॉज आहे की गर्भधारणा.' पेरीमेनोपॉज क्लबमध्ये आपले स्वागत आहे? मला तुमच्या रजोनिवृत्तीच्या अनुभवाबद्दल सांगा. तुम्हीही असे गोंधळाचे क्षण अनुभवले असतील हेही सांगा. अस तिनं यामध्ये म्हटलं आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी गर्भधारणेची भीती का?

ट्विंकलच्या व्हिडिओवर अनेक महिलांनी कमेंट करत आपले अनुभव शेअर केले आहेत. बहुतांश स्त्रियांना असा अनुभव आला आहे की, जेव्हा त्यांची मासिक पाळी वयाच्या ५० व्या वर्षी उशीरा येते तेव्हा त्यांना समजत नाही की, ही रजोनिवृत्तीची सुरुवात आहे की त्या गर्भवती झाल्या आहेत.

हिंदुजा आणि वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबईच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सरिता नाईक सांगतात की, जर वयाच्या ५० व्या वर्षी मासिक पाळी उशिरा येत असेल, तर ती रजोनिवृत्ती समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गर्भधारणेची चिन्हे देखील असू शकतात. पहिल्यांदा मासिक पाळी मिस होणे म्हणजे रजोनिवृत्ती होत नाही. अनेक स्त्रिया वयाच्या पन्नाशीतही गर्भवती होतात.

मासिक पाळी उशीरा आली तर काय करावे?

प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या वयात रजोनिवृत्तीचा अनुभव येतो. काही महिलांना वयाच्या ४० व्या वर्षी रजोनिवृत्तीचा अनुभव येतो तर अनेक महिलांना वयाच्या ५० नंतर रजोनिवृत्तीचा अनुभव येतो.

असा परिस्थितीत मासिक पाळी उशीरा आली तर निष्काळजीपणा महागात पडू शकतो. वयाच्या पन्नाशीनंतरही गर्भधारणा शक्य आहे, त्यामुळे त्याची तपासणी आवश्यक आहे. तुमची मासिक पाळी उशीरा येत असल्यास, गर्भधारणा चाचणी करा आणि स्त्रीरोगतज्ञाला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT