Vicky Kaushal New Song Esakal
Premier

Bad Newz : 'जानम' गाण्यातील विकी-तृप्तीच्या हॉट केमिस्ट्रीने इंटरनेटला आग लावली ; नेटकरी म्हणाले...

Bad Newz New Movie Song : विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' सिनेमातील 'जानम' या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला असून त्यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीची चर्चा सगळीकडे होतेय.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal & Tripti Dimri : अभिनेता विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमातील तौबा तौबा हे विकीवर चित्रित झालेलं गाणं गाजतं आहेच पण त्याबरोबरच सध्या आणखी एका गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतंच या सिनेमातील 'जानम' या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि या टीझरने सगळीकडे खळबळ निर्माण केलीये.

जानम गाण्याचा भन्नाट टीझर

बॅड न्यूज सिनेमातील जानम हे गाणं लवकरच सोशल मीडियावर रिलीज करण्यात येणार आहे पण या गाण्यातील विकी आणि तृप्तीच्या सिझलिंग केमिस्ट्रीचा अंदाज टीझर पाहूनच प्रेक्षकांना आलाय. मोनीकिनी घातलेली तृप्ती आणि शर्टलेस विकी यांची पुलमधील केमिस्ट्री असो किंवा डायनिंग टेबलवरील हॉट रोमान्स गाण्याच्या टीझरमधील या सीन्सने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. विकीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर गाण्याचा टीझर शेअर केला आणि लिहिलं, “ऐसे ना यूं देखो देखो जानम… #जानम उद्या रिलीज होतंय." त्याने शेअर केलेल्या या पोस्टमुळे प्रेक्षक हे पूर्ण गाणं पाहायला आतुर झाले आहेत. विशाल मिश्राने हे गाणं गायलं आहे.

विकी आणि तृप्तीची ही केमिस्ट्री पाहून अनेकांनी चक्क विकीला कॅटरिनाला हे गाणं कसं वाटलं असा प्रश्न विचारला. एका चाहत्याने लिहिले, “भाई आपको कतरिना भाभी कुछ कहती नहीं है क्या?” तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली, “कतरिना दीदी, मैं तो नहीं सेहेती.” दुसऱ्या एका चाहत्याने विचारले, “कतरिनाला याबद्दल माहिती आहे का?” असा प्रश्न विचारत कॅटरिनाची या गाण्यावर काय प्रतिक्रिया आहे अशी विचारणा केली.

त्यामुळे आता कॅटरिना या गाण्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Janam Song Comments

 या चित्रपटात विकी कौशल, एमी विर्क आणि तृप्ती डिमरी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि नेहा धुपिया देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आनंद तिवारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी कथालेखन केले आहे. १९ जुलै २०२४ ला हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

SCROLL FOR NEXT