Vicky Kaushal esakal
Premier

Vicky Kaushal: 'छावा' मधील विकीचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील फोटो व्हायरल

Vicky Kaushal: विकीचा सिनेमातील लूक रिव्हील होऊ नये म्हणून सुद्धा सेटवर खूप काळजी घेतली जातेय. तरीही विकीचा सिनेमातील एक लूक लीक झाला आहे.

priyanka kulkarni

Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) आगामी सिनेमा छावा गेल्या बराच काळापासून चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमा बनतोय आणि या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकी खूप मेहनत घेतोय. विकीचा सिनेमातील लूक रिव्हील होऊ नये म्हणून सुद्धा सेटवर खूप काळजी घेतली जातेय. तरीही विकीचा सिनेमातील एक लीक झाला आहे.

झूम टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर विकीचा छावा सिनेमातील एका लूकमधील फोटो शेअर केले. या फोटोमध्यविकीने साधूंप्रमाणे पोशाख केला असून कपाळाला गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कवड्याची माळ, सदरा, कमरेला बांधलेला शेला आणि धोतर या लूकमध्ये विकी दिसतोय. सोशल मीडियावर त्याचा हा लूक चर्चेत आहे. या लूकवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या एखाद्या गुप्त मोहिमेचा सीन शूट होत असावा असं वाटतंय. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या वर्षाच्या अखेरीस छावा रिलीज होणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या शुटिंगचं दुसरं शेड्युल सुरु आहे. तर मराठी कलाकार आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे आणि संतोष जुवेकर यांचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मॅडोक फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमात अजून कोण मराठी कलाकार दिसणार आहे ते अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

यासोबतच विकीचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'बॅड न्यूज' हा सिनेमा त्याचा लवकरच प्रदर्शित होणार आहे. १९ जुलै २०२४ला हा सिनेमा रिलीज होणार असून तृप्ती डिमरी, अॅमी विर्क हे कलाकार या सिनेमात काम करणार आहेत. तर या वर्षाच्या सुरुवातीला विकीचा सॅम बहादूर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात त्याने माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं तर या सिनेमाने सिनेमागृहात पन्नास आठवडे पूर्ण केले. मेघना गुलजार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT